Mahaparinirvan Din Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'हे' अनमोल विचार शेअर करून करा महामानवाला त्रिवार अभिवादन!
बाबासाहेब आंबेडकर यांचे खालील अनमोल विचार शेअर करून महामानवाला त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
Mahaparinirvan Din Quotes in Marathi: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे 06 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. दरवर्षी 6 डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din 2023) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करणे. डॉ भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना आपण सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखतो. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते.
परिनिर्वाण म्हणजे 'मृत्यूनंतरचे निर्वाण.' परिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे मुख्य तत्व आणि ध्येय आहे. यानुसार जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. याशिवाय तो जीवनचक्रातूनही मुक्त राहतो. पण निर्वाण प्राप्त करणे सोपे नाही. त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावे लागते. महापरिनिर्वाण दिन निमित्त तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खालील अनमोल विचार शेअर करून महामानवाला त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Mahaparinirvan Diwas 2023: महापरिनिर्वाण दिन तारीख आणि महत्त्व घ्या जाणून)
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कोणत्याही समाजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गरीब आणि दलित वर्गाची स्थिती सुधारण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. समाजातून अस्पृश्यतेसह अनेक प्रथा दूर करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. बौद्ध अनुयायांच्या मते डॉ.आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्वाण मिळाले आहे. म्हणून त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.