Mahatma Phule Quotes in Marathi: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे 'हे' प्रेरणादायी विचार शेअर करून समाजसुधारकाच्या स्मृतिस करा अभिवादन!

थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे अनमोल विचार सोशल मीडियावर शेअर करा.

Mahatma Phule Quotes (PC - File Image)

Mahatma Phule Quotes in Marathi:  महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी महिलांना मुक्तपणे जगता यावे यासाठी परंपरावादी विचारांनी समाजात सुधारणा घडवून आणण्यात विशेष योगदान दिले आहे. ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. ज्योतिरावांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब पेशव्यांसाठी फुले विक्रेते म्हणून काम करत होते. त्या काळात स्त्रीविरोधी दुष्कृत्ये मोठ्या प्रमाणावर होती.

बालविवाह, महिला आणि विधवांचे शोषण सर्रास होते. पण ज्योतिराव फुले यांनी स्त्रीविरोधी कुप्रथा आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला. महिलांसाठी शाळाही उघडली. थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे अनमोल विचार सोशल मीडियावर शेअर करा. (हेही वाचा - Mahatma Jyotiba Phule Death Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्यांचे 10 प्रेरणादायी विचार )

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.

- महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Quotes (PC - File Image)

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

- महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Quotes (PC - File Image)

भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे.

- महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Quotes (PC - File Image)

समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

– महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Quotes (PC - File Image)

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात

– महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Quotes (PC - File Image)

विद्वेविना मती गेली, मती विना निती गेली,

नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले,

वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका महाविद्वेने केले.

- महात्मा ज्योतिबा फुले

Mahatma Phule Quotes (PC - File Image)

ज्योतिबा फुले यांचे नाव 19व्या शतकातील महान समाजसुधारकांमध्ये समाविष्ट आहे, ज्यांनी महिला सक्षमीकरणासाठी अभूतपूर्व योगदान दिले. त्यांनी आयुष्यभर महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी, बालविवाहाच्या विरोधात आणि विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ काम केले.