Happy Nurses Day 2023 Quotes in Marathi: जागतिक परिचारिका दिनानिमित्त Images, Messages, Wishes च्या माध्यमातून नर्सेसबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे 'हे' खास विचार करा शेअर

या दिवशी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांना या दिवशाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Nurses Day 2023 Quotes in Marathi (PC - File Image)

Happy Nurses Day 2023 Quotes in Marathi:  आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. 1820 मध्ये या दिवशी फ्लोरेन्स नाइटिंगेल यांता जन्म झाला होता. फ्लॉरेन्स नाइटिंगेल आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक होत्या आणि त्यांना 'द लेडी विथ द लॅम्प' म्हणूनही ओळखले जाते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, आरोग्य सेवेतील परिचारिकांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.

विशेषत: महामारीच्या काळात जेव्हा रुग्णालयातील कर्मचारी घरी न जाता अनेक आठवडे लोकांच्या सेवेत गुंतले होते, तेव्हा सर्वांना परिचारिकांची गरज समजली. परिचारिका दिनानिमित्त त्यांचे आभार मानन्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परिचारिका दिन साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिकांना या दिवशाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - International Nurses Day 2023 Marathi Wishes: जागतिक परिचारिका दिनानिमित्त Images, Wishes द्वारे व्यक्त करा कृतज्ञता)

"नम्रपणे बोला, तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या डोळ्यात, तुमच्या स्मितमध्ये, तुमच्या अभिवादनात देखील उबदारपणा दयाळूपणा असू द्या. नेहमी आनंदी हास्य असू द्या. फक्त रुग्णांची काळजी घेऊ नका, तर त्यांचे हृदय देखील जिंका ” – मदर तेरेसा

Nurses Day 2023 Quotes in Marathi (PC - File Image)

“एक परिचारिका म्हणून,

आम्हाला आमच्या रूग्णांचे हृदय, मन, आत्मा आणि शरीर,

त्यांचे कुटुंब याना बरे करण्याची संधी आहे.

त्यांना तुमचे नाव आठवणार नाही,

पण तुम्ही त्यांना ज्या प्रकारे अनुभव दिला,

ते ते कधीही विसरणार नाहीत." - माया अँजेलो

Nurses Day 2023 Quotes in Marathi (PC - File Image)

मानवाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या क्षणांचा साक्षीदार म्हणजे नर्स- Christine Bell

Nurses Day 2023 Quotes in Marathi (PC - File Image)

स्वत: ला ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्यांच्या सेवेत स्वत:ला झोकून देणे- महात्मा गांधी

परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Nurses Day 2023 Quotes in Marathi (PC - File Image)

काळजी, सेवा आणि मदत करण्याच्या वृत्तीमुळेच

प्रत्येक नर्स नर्सिंगकडे आकर्षित होते

- Christina Feist-Heilmeier

परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Nurses Day 2023 Quotes in Marathi (PC - File Image)

काळजी घेणे हे नर्सिंगचे सार आहे

- जीन वॉटसन

परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Nurses Day 2023 Quotes in Marathi (PC - File Image)

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. वास्तविक 12 मे हा फ्लोरेन्स नाइटिंगेल चा जन्मदिवस आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने ही तारीख निवडली.