Happy Navratri 2021 HD Images: नवरात्र उत्सव साजरा करा खास WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs शुभेच्छांसह, नऊ दिवस लुटा रंगांचा आनंद
त्यासाठी Navratri 2021 WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers इथे देत आहोत. या आपण इथून डाऊलनोड करु शकता. या काळातच रंगांनाही मोठे महत्त्व असते. आपही जाणून घेऊ शकात कोणत्या दिवशी कोणते रंग वापरु शकता.
नवरात्रीचे (Happy Navratri 2022) नऊ दिवस म्हणजे आनंद आणि उत्साह. या नऊ दिवसांमध्ये कालीमाता म्हणजेच दुर्गा देवीची पुजा केली जाते. या काळात दुर्दादेवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शवातता. या काळात घराघरांमध्ये घटस्थापना (Navratri Ghatasthapana 2022 ) केली जाते. घटस्थापना हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा सण असतो. या दिवसात नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. नवरात्रोत्सवादरम्यान आपणही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतात. त्यासाठी Navratri 2022 WhatsApp Messages, Facebook Greetings, Quotes, HD Images, GIFs आणि Wallpapers इथे देत आहोत. या आपण इथून डाऊलनोड करु शकता. या काळातच रंगांनाही मोठे महत्त्व असते. आपही जाणून घेऊ शकात कोणत्या दिवशी कोणते रंग वापरु शकता.
पहिला दिवस- शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा अर्चना केली जाते. पहिल्या दिवशी पिवळा रंग वापरला जातो. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे वापरणे शुभ असते असे सांगतात.
दुसरा दिवस- नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला हिरवा रंग प्रिय असतो. त्यामुळे लोक या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करुन देवीची पूजा करतात..
तिसरा दिवस- नवरात्रीच्या दिसऱ्या दिवशी करडा रंग देवीला प्रिय असतो. त्यामुळे या दिवशी ग्रे रंगाचे कपडे परिधान करतात. काही लोक या दिवशी मिक्स रंगाचे कपडेही परिधान करतात.
चौथा दिवस- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करतात. या दिवशी देवीने खास रुप घेतलेले असते, असे सांगितले जाते.
पाचवा दिवस- नवरात्रिच्या पाचव्या दिवशी पांढरा रंग परिधीान केला जातो. या दिवशी पाढऱ्या रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्या मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते.
सहावा दिवस- नवारत्रीच्या सहाव्या दिवशी लाल कपडे घालून देवीची पूजा केली जाते. या दिवशी लाल कपडे घातल्याने देवी प्रसन्न होते असे मानतात. विशेष म्हणजे या दिवशी पूजेचे साहित्यही लाल रंगाचेच असते.
सातवा दिवस- या दिवशी देवीची पूजा रात्रीच्या वेळी केली जाते. या दिवशी देवीला निळा रंग खूप आवडतो. त्यामुळे या दिवशी भक्त मंडळी निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात.
आठवा दिवस- नवरात्रीचा आठवा दिवस महत्त्वाचा असतो. उत्सवाचा शेवटून दुसरा दिवस असल्याने या दिवशी विशेष उत्साह असतो. या दिवशी गुलाबी रंग परिधान केला जोतो. सांगितले जाते की, या दिवशी गुलाबी रंग धारण केल्यास देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात.
नववा दिवस- नवारत्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नववा दिवस. या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होते. या दिवशी वांगी किंवा निळा रंग धारण केला जातो.
नवरात्रोत्सवाच्या काळात रंगाना मोठे महत्त्व असते. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे रंग वापरले जातात. महत्त्वाचे म्हणजे दरवर्शी नवरात्रीचे नऊच दिवस असतात. पण या नऊ दिवसात वापरायचे रंग प्रत्येक वर्षी वेगवेगळे असतात. म्हणजे यंदा ज्या दिवशी जे रंग आले आहेत ते पुढच्या वर्षी तसेच येतील असे नाही. त्यात दिवसानुरुप बदल होऊ शकतो. हे त्या त्या वर्षातील पंचांग आणि स्थितीवर अवलंबून असते, असे सांगतात. या काळात दुर्गा देवी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रुपांमध्ये देविचा निवास असतो.