Navratri Colours 2020 Full Schedule: शारदीय नवरात्री नऊरंगांचं मराठी वेळापत्रक तारखेनुसार इथे पहा आणि मोफत डाऊनलोड करा PDF स्वरूपात!

मग यंदा घटस्थापना ते दसरा दरम्यान साजर्‍या होणार्‍या नऊ रात्रींमध्ये पहा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची आहे धूम.

Navratri colours 2020 (Photo Credits: File Image)

Navratri 2020 Colours Schedule With Dates:  यंदा अधिक अश्विन मासाची 16 ऑक्टोबरला सांगता होत असल्याने 17 ऑक्टोबरपासून घटस्थापना (Ghatasthapana) करून देवीच्या जागराला सुरूवात होत आहे. भारतामध्ये नवरात्र साजरी करण्याची प्रांतानुसार पद्धत वेगळी असली तरीही त्यामध्ये नऊ रात्री नऊ रंगाची धूम सर्वत्र असते.  कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्रासह देशभर नवरात्र अत्यंत साधेपणाने साजरी केली जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून नवरात्रीच्या दिवसांत प्रामुख्याने स्त्रिया नवरात्रीमधील (Navratri)  नऊ दिवस नऊ ठराविक रंगाचे कपडे परिधान करतात. यंदा सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे काही बंधनं असली तरीही घरच्या घरी आणि सुरक्षितपणे तुम्ही हा सण साजरा करू शकतात. मग त्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे याची तयारी सुरू झाली असेल तर जाणून घ्या यंदा नवरात्री 2020 मध्ये कोणत्या नवरंगांची रेलचेल असेल. आणि यंदा व्हर्च्युअल जगात नवरात्री नवरंग 2020  (Navratri 2020 Colours) साजरा करताना तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत, परिवारासोबत, प्रिय व्यक्तींसोबत हे नवरंग 2020 शेअर करयला विसरू नका. इथे पहा नवरात्री 2020 नऊरंगांचे वेळापत्रक PDF स्वरूपात!

शारदीय नवरात्री 2020 ची सुरूवात यंदा 17 ऑक्टोबर, गुरूवार दिवशी होणार आहे. तर दसरा यंदा 25 ऑक्टोबर, रविवारी आहे. या नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या काळामध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात आदिशक्तीला पूजण्याचं, नवनिर्मितीच्या पावन काळात देवींच्या विविध रूपाची आराधना करण्याचं आवहन केलं जातं. त्यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नवरात्रीची सुरूवात होते. मग जाणून घ्या यंदाच्या नवरात्रीचे दिवस आणि कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करू शकाल? Navratri 2020 Calendar: घटस्थापना, खंडे नवमी ते दसरा यंदा नवरात्री मध्ये कोणत्या दिवशी? जाणून घ्या त्याचे पुजा विधी, महत्त्व

नवरात्री नवरंग 2020

यंदा नवरात्रीमध्ये 17 ऑक्टोबरला राखाडी, 18 ऑक्टोबरला नारंगी, 19ऑक्टोबरला पांढरा, 20 ऑक्टोबरला लाल, 21ऑक्टोबरला निळा, 22ऑक्टोबरला पिवळा, 23ऑक्टोबरला हिरवा, 24ऑक्टोबरला मोरपिसी, 25ऑक्टोबरला जांभळा रंग आहे.

Navratri Colours 2020 | File Image

दरम्यान नवरात्रीमध्ये नवरंगाचे विशिष्ट कपडे घालण्याची प्रथा ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीमधून आलेला आणि पुढे लोकप्रिय झालेला ट्रेंड आहे. त्याच्या धार्मिक रूढी, परंपरांशी कोणताही थेट संबंध नाही. नवरात्रीच्या निमित्ताने आदिशक्तीची पूजा करताना महिलांमधील ऐक्य जपण्यासाठी प्रत्येक दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड आहे. Maharashtra Navratri 2020 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जाहीर केली नवरात्र 2020 साठी मार्गदर्शक तत्वे; राज्यात गरबा व दांडियाचे कार्यक्रम होणार नाहीत.

भारतामध्ये विविध स्वरूपात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. प्रामुख्याने या निमित्ताने घटस्थापना केली जाते आणि पुढे 9 दिवस हा उत्सव चालतो. तर पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीमध्ये पंचमीपासून हा सण सुरू होतो. दुर्गा पुजा म्हणून तो ओळखला जातो.