National Youth Day 2021 HD Images: स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त खास Messages, Wishes, WhatsApp Status शेअर करून द्या 'राष्ट्रीय युवा दिवसा'च्या शुभेच्छा

दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने 1984 मध्ये हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

Happy National Youth Day 2021

12 जानेवारी हा दिवस म्हणजे स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांची जयंती. दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने 1984 मध्ये हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. यामागील मुख्य उद्दीष्ट म्हणजे भारताचे महान समाज सुधारक, विचारवंत आणि तत्वज्ञानी स्वामी विवेकानंदजी यांचे विचार आणि आदर्शांनी देशभरातील भारतीय तरुणांना प्रोत्साहित करणे, जेणेकरून ते या गोष्टी आपल्या आयुष्यात समाविष्ट करु शकतील. या दिवशी देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम होत असतात, रॅली आयोजित केल्या जातात, योगासन स्पर्धा आयोजित केल्या जातात, व्याख्याने होतात, स्वामी विवेकानंद साहित्याचे प्रदर्शन भरवले जाते.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी, 1863 रोजी झाला होता. ते वेदांतचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ दत्त होते. अमेरिकेत 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताच्या वतीने सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. तर अशा या खास दिवशी Images, Messages, Wishes, Greetings पाठवून शुभेच्छा द्या.

Happy National Youth Day 2021
Happy National Youth Day 2021
Happy National Youth Day 2021
Happy National Youth Day 2021
Happy National Youth Day 2021

(हेही वाचा: National Youth Day 2021: स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून का साजरा केला जातो?)

दरम्यान, स्वामी विवेकंद हे तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता.