Narali Purnima Messages : नारळी पौर्णिमा निमित्त मराठमोळ्या Wishes, WhatsApp Status, Quotes च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!

नारळी पौर्णिमा म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता, समुद्राप्रती आदर आणि सुख-समृद्धीची मनोकामना व्यक्त करण्याचा सुंदर सण साजरा करताना तुमच्या आप्तेष्टांनाही द्या शुभेच्छा .

महाराष्ट्रात श्रावणी पौर्णिमेचा (Shravani Pournima) सण हा नारळी पौर्णिमेचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्रदेवतेची पूजा करण्याची रीत आहे. विशेषतः कोळी समाजासाठी हा महत्त्वाचा एक पारंपरिक सण आहे. नारळी पौर्णिमा (Narali Pournima) ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी भागातील लोकजीवन, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते जपणारा सण आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील अनेक भागांत हा सण उत्साहात साजरा केला जातो. मग तुमच्या कोळीबांधव मित्र, मैत्रिणींना, आप्तेष्ट, नातेवाईकांना या नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Messages, Quotes, Facebook, Instagram च्या माध्यमातून देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.

नारळी पौर्णिमा म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता, समुद्राप्रती आदर आणि सुख-समृद्धीची मनोकामना व्यक्त करण्याचा सुंदर सण आहे. नक्की वाचा: Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला यंदा 5 तासांहून अधिक काळाचे चंद्रग्रहण, राखीचा सण साजरा करता येणार का? 

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

समुद्राच्या लाटांसोबत आनंद येवो,

आणि आयुष्यात सुख-समृद्धी नांदो

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

लाटांसारखे सुख वाढत राहो,

नारळासारखे आयुष्य गोड राहो.

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

समुद्राच्या अथांग लाटांसारखे

आपल्या आयुष्यात सुख-समाधान भरभरून येवो.

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

समुद्र शांत राहो, मन प्रसन्न राहो,

आणि प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असो.

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

नारळाच्या गोडव्याप्रमाणे

नात्यांमध्ये प्रेम आणि आयुष्यात आनंद सदैव राहो.

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे या काळात मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेनंतर समुद्र शांत होण्याची आणि मासेमारीचा नवीन हंगाम सुरू करण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोळी बांधवांसाठी हा सण समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि सुरक्षिततेची प्रार्थना करण्याचा दिवस मानला जातो.मग अशा या मंगलमय दिवशी नारळवडी, नारळीभाताचा आस्वाद घेत हा सण साजरा करा.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement