Narali Purnima 2024 Special Marathi Songs: नारळी पौर्णिमेनिमित्त 'ही' खास मराठमोळी कोळीगीत ऐकूण साजरा करा कोळीबांधवांचा खास सण!

या दिवशी ते एकमेकांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. अनेक ठिकाणी या दिवशी कोळी बांधव कोळीगीतांवर पारंपारिक नृत्य करतात. नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही देखील खालील कोळीगीतं ऐकूण या सणाचा आनंद लुटू शकता.

Narali Purnima 2024 Special Marathi Songs (फोटो सौजन्य - You Tube)

Narali Purnima 2024 Special Marathi Songs: महाराष्ट्रात कोकण आणि समूद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या प्रदेशात नारळी पौर्णिमेचा (Narali Purnima 2024) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा नारळी पौर्णिमेचा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या दिवशी श्रावण पौर्णिमा (Shravan Purnima 2024) तसेच रक्षा बंधनाचा (Raksha Bandhan 2024) सणही साजरे करण्यात येणार आहेत. श्रावण महिन्यात साजरा होणाऱ्या या सणाला कोळी (Koli) समाजामध्ये अत्यंत महत्त्व आहे. कारण, या दिवसापासून मासेमारीच्या हंगामाला सुरूवात होते.

या दिवशी कोळी बांधव एकत्र येऊन समुद्राची पूजा करतात. तसेच समुद्राला नारळ अर्पण करतात आणि वरुण देवाकडे प्रार्थना करतात. हा दिवस कोळी बांधवांसाठी अत्यंत शुभ असतो. या दिवशी ते एकमेकांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतात. अनेक ठिकाणी या दिवशी कोळी बांधव कोळीगीतांवर पारंपारिक नृत्य करतात. नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही देखील खालील कोळीगीतं ऐकूण या सणाचा आनंद लूटू शकता. (हेही वाचा - Narali Purnima 2024 Date and Significance: नारळी पौर्णिमेची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या, संपूर्ण माहिती)

नारळी पौर्णिमेनिमित्त खास मराठी गीत -

वरील खा कोळी गीतं ऐकूण तुम्ही नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करू शकता. या गाण्यांमुळे घरातील वातावरण अगदी आनंदी होऊन जाईल.