Narali Purnima 2019 Wishes: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरी करा श्रावणी पौर्णिमा
मग या दिवसाच्या शुभेच्छा HD Images, Greetings,Messages, GIFs च्या माध्यमातून देण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रिटींग्स शेअर करून सेलिब्रेट करा नारळी पौर्णिमेचा आनंद
Narali Purnima 2019 Marathi Messages & Wishes: हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्यातील पौर्णिमा यंदा 14 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव श्रावणी पौर्णिमा (Shravan Purnima) हा सण नारळी पौर्णिमा ( Narali Purnima) म्हणून साजरी करतात. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा मासेमारीला सुरूवात केली जाते. कोळी बांधव समुद्रात होडी घेऊन जातात. समुद्र हे वरुणाचे स्थान असल्याने वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला नारळी पौर्णिमेदिवशी नारळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. मग या दिवसाच्या शुभेच्छा HD Images, Greetings,Messages, GIFs च्या माध्यमातून देण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रिटींग्स शेअर करून सेलिब्रेट करा नारळी पौर्णिमेचा आनंद
नारळी पौर्णिमेदिवशी कोळी बांधव समुद्रकिनारी एकत्र गोळा होतात, समुद्राची पूजा करतात. कोळी बांधवांमध्ये या दिवशी नारळ फोडीचा खेळ खेळतात. यामध्ये हातात नारळ घेऊन परस्परांवर आपटून फोडण्याची ही स्पर्धा देखील अनेक कोळीवाड्यांमध्ये रंगते. Narali Purnima 2019: श्रावणी पौर्णिमेदिवशी नारळी पौर्णिमा साजरी करण्याचं महत्त्व काय? यंदा समुद्र पूजनाचा शुभ मुहूर्त काय?
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरूवात असणार्या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख, शांती समृद्धी घेऊन येवो,
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
कोळीवारा सारा सजला गो
कोळी यो नाखवा सजलाय गो
मासळीचा दुष्काळ सरू दे
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
नारळी पौर्णिमा तुम्हाला
आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येवो,
समुद्र देव शुभाशिर्वाद देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पूर्णिमा शुभेच्छा!
सण आयलाय गो, आयलाय गो
नारळी पुनवेचा
मनी आनंद मावेना, कोळ्यांच्या दुनियेचा
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
नारळी पौर्णिमा शुभेच्छासंदेश व्हिडिओ
नारळी पौर्णिमेच्या पूजेला कोळी बांधव पारंपारिक साजशृंगार करून हा सण साजरा करतात. तसेच नारळापासून बनवलेले गोडा-धोडाचे पदार्थ बनवले जातात.