Mother's Day 2020 Songs: 'आई' ची महती शब्दांतून मांडणारी '5' हृदयस्पर्शी गाणी
ज्यात 80 च्या दशकातील अशी काही गाणी आहेत जी आपण कधीही विसरु शकत नाही. त्यातीलच आणि सध्याची काही निवडक गाणी:
Mother's Day Special Songs: आईचे महत्व शब्दांत मांडता येणार नाही हे निर्विवाद सत्य आहे. आईचे कौतुक करावे तितके कमीच आहे. घरदार, मुलं, नोकरी सांभाळून संसाराचा गाडा चालविणारी ही जणू अष्टपैलू व्यक्तिमत्वच आहे. अशा या आईचे विशेष आभार मानण्याचा, तिचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 'मातृदिन.' जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हा दिवस महाराष्ट्र, देश आणि जगभरात साजरा केला जाईल. यंदा या मातृदिनावर लॉकडाऊनचे सावट असल्यामुळे आपल्याला घराबाहेर न पडता घरच्या घरी हा दिवस साजरा करायचा आहे. यासाठी तुमच्या आईसाठी स्पेशल जेवणाचा बेत करु शकता. यासोबत या दिवशी आईचे महती सांगणारी सुंदर गाणी देखील तुम्ही ऐकू शकता.
मराठी मध्ये आईचे माहात्म्य सांगणारी खूप सुंदर गाणी आली. ज्यात 80 च्या दशकातील अशी काही गाणी आहेत जी आपण कधीही विसरु शकत नाही. त्यातीलच आणि सध्याची काही निवडक गाणी:
ए आई तू भासे ठायी
आई सारखे दैवत
आई पहिला संस्कार
आई म्हणोनि कोणी
हंबरूनि वासराले चाटती जवा गाय
मराठी मध्ये आईचे माहात्म्य सांगणारी खूप सुंदर गाणी आली. ज्यात 80 च्या दशकातील अशी काही गाणी आहेत जी आपण कधीही विसरु शकत नाही. त्यातीलच आणि सध्याची काही निवडक गाणी:
या गाण्यांसह यंदा तुम्ही स्वत: बनवलेलं ग्रीटिंग आईला देऊन बघा. हे करताना तुम्हांला जितकी मज्जा येईल त्याहून अधिक मज्जा आईला ते न्याहाळताना बघताना येईल. अशा वस्तू तुम्हांला आणि आईला दोघांनाही एक खास आठवण देऊन जाईल नक्की.