Mother's Day 2021 Wishes in Marathi: मातृदिनाच्या शुभेच्छा Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन आईविषयी व्यक्त करा कृतज्ञता!
मात्र तिच्या निस्सीम, नि:स्वार्थी प्रेमाला, तिच्या त्यागाला सलाम करण्यासाठी आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Mother's Day 2021 Wishes in Marathi: 'आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही. म्हणून श्रीकारांच्या नंतर अ आ ई'... ग.दि.माडगूळकरांची ही कविता खूप काही सांगून जाते. म्हणतात ना देव प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही, म्हणून त्याने धरतीवर आईला पाठवले. आईचे माहात्म्य शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आपल्या मुलासाठी काय वाटेल ते करायची तिची तयारी असते ते ही अगदी रात्रीचा दिवस करून... म्हणून आपल्याला कधी काही दुखलं, खुपलं तर सर्वात आधी आपल्या तोंडी शब्द येतो तो म्हणजे 'आई'. या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या 9 मे ला संपूर्ण जगभरात मातृदिन साजरा केला जाईल. या दिनानिमित्त तुम्ही तुमच्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
आपल्या आईचे ऋण आपण सात जन्म घेतले तरीही फेडू शकणार नाही. मात्र तिच्या निस्सीम, नि:स्वार्थी प्रेमाला, तिच्या त्यागाला सलाम करण्यासाठी आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
तुझ्यामुळे घेतला मी जन्म
पाहिले हे सुंदर जग डोळे भरून
कसे ऋण फेडू तुझे आई
घेतले मला जिने उदरात सामावून
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी
जिने केला रात्रीचा दिवस,
त्या माऊलीसाठी साजरा करूया
मातृदिनाचा हा सुंदर दिवस
मातृदिनाच्या शुभेच्छा!
ती आहे म्हणून सारे विश्व आहे
ती आहे म्हणून घराला घरपण आहे
ती आहे म्हणून नात्यांत गोडवा आहे
ती आहे म्हणून हे जग सुंदर आहे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ती कुणासाठी आहे ताई
तर कुणासाठी आहे माई
शब्दांत वर्णन करु कसे तिचे
ती आहे माझी प्रेमळ आई
मातृदिनाच्या शुभेच्छा!
आ म्हणजे आत्मा
ई म्हणजे ईश्वर
आणि या ईश्वराचा आत्मा जिच्यात आहे
त्या आईविना सारे जग आहे नश्वर
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई आणि मुलाचे नाते हे सर्व नात्यांपेक्षा खूप वेगळं आहे. कारण आई ही जगातील एकमेव अशी व्यक्ती आहे जी आपल्या बाळाला इतरांपेक्षा 9 महिने जास्त ओळखते. अशा या आईला कधीच दुखवू नका. तिला कायम आनंदी ठेवा. तिच्यावर कधीही रागवू नका. आईचा कायम आदर करा.