Mother's Day 2020: महाराष्ट्रात 90 तर देशात 1218 पुरुषांसह तब्बल 31 हजार मम्मी; हे कसे काय? घ्या जाणून
अशा स्थितीमध्ये सर्व नागरिकांना घरीच थांबण्याचे अवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मातृत्वदिनावरही होत असून, सर्वजण आपापल्या घरीच मातृदिन साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे.
Matru Din 2020: महाराष्ट्रात 90 तर देशात 1218 पुरुषांसह तब्बल 31 हजार मम्मी (Mummy) हे शिर्षक वाचून कदाचित आपल्या भूवया उंचावल्या असतील. असं कसं काय? पण हो, हे तसंच आहे. कारण 31379 लोक असे आहे ज्यांना सर्वजण मम्मी म्हणूनच हाक मारतात. मम्मी म्हणजे आई. आजकाल आईला मम्मी म्हणण्याची इंग्रजाळलेली पद्धत आपल्याकडेही रुढ झाली आहे. अर्थात इथे उल्लेख केलेले हे 31379 लोक अशा मम्मींपैकी नाहीत. तर यांचे नावच मुळात मम्मी असे आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडे नोंदविलेल्या मतदान यादीतही या मंडळींच्या नावाचा उल्लेख मम्मी असाच आहे. 20 ते 80 अशा सर्व वयोगटांमध्ये हे नाव आढळून आले आहे. मदर्स डे निमित्त अनेक लोक आपल्या आईला मातृदिन शुभेच्छा संदेश पाठवत आहेत. पण, काही लोकांचे नावच आई किंवा मम्मी असते हे किती विशेष.
मम्मी या नावाचा निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यनिहाय विचार करता उत्तर प्रदेशमध्ये हे नाव सर्वाधिक वापरले गेले आहे. लाईव्ह हिंदुस्तान डॉट कॉम नावाच्या एका संकेतस्थळाने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात यावर प्रकाश टाकला आहे. विशेष असे की, मम्मी हे नाव पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये आढळते. प्राप्त माहितीनुसार देशात एकूण 30161 महिला मतदार हे मम्मी नावाचे आहेत. तर 1218 मतदार हे पुरुष आहेत. (हेही वाचा, Matru Din 2020 Messages: मातृदिना निमित्त मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून व्यक्त करा आईप्रती आपल्या भावना!)
कोणत्या राज्यात किती मम्मी?
'मम्मी' नावाची राज्यनिहाय आकडेवारी | ||
क्र | राज्याचे नाव | संख्या |
1. | उत्तर प्रदेश | 91 |
2. | ओडसा | 20473 |
3. | असम | 6235 |
4. | केरळ | 2394 |
5. | आंध्र प्रदेश | 368 |
6. | अरुणाचल प्रदेश | 230 |
7. | बिहार | 89 |
8. | छत्तीसगढ | 37 |
9. | गुजरात | 39 |
10. | झारखंड | 92 |
11. | हरियाणा | 160 |
12. | मध्य प्रदेश | 45 |
13. | मणीपूर | 79 |
14. | महाराष्ट्र | 90 |
15. | तेलंगणा | 117 |
16. | राजस्थान | 49 |
17. | कर्नाटक | 59 |
18. | मिजोराम | 15 |
आज मातृत्वदिन असल्याने संपूर्ण जग आणि देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक वर्षी मातृत्वदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे अवघा देशच नव्हे तर जगही लॉकडाऊन आहे. अशा स्थितीमध्ये सर्व नागरिकांना घरीच थांबण्याचे अवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मातृत्वदिनावरही होत असून, सर्वजण आपापल्या घरीच मातृदिन साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे.