Mother’s Day 2019 Gift Ideas: मदर्स डे निमित्त आईला सरप्राईज देण्यासाठी '5' बजेट फ्रेंडली आणि हटके गिफ्ट आयडियाज!
आईची थोरवी वर्णन करण्यासाठी शब्द अपूरे पडतील. तरी देखील अनेक लेखक, कवींनी आईची महती शब्दात वर्णन केली आहे.
Mother’s Day 2019: आईची थोरवी वर्णन करण्यासाठी शब्द अपूरे पडतील. तरी देखील अनेक लेखक, कवींनी आईची महती शब्दात वर्णन केली आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे.
मदर्स डे म्हणजेच मातृ दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आईतुल्य व्यक्तिमत्त्वांना छानसे गिफ्ट देऊन तुम्ही त्यांच्यावरील प्रेमाची पोचपावती देऊ शकता. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते- आई, सासू, आजी किंवा इतर कोणी.
आईवरील प्रेम व्यक्त करताना काय गिफ्ट देऊ असा प्रश्न पडलाय? मग या काही आयडियाज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.......
1. फुलांचा गुच्छ
अनेकदा काय गिफ्ट द्यावा, हा प्रश्न पडतो. अशावेळी फुलं उत्तम पर्याय ठरतात. तुम्ही रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ गिफ्ट करु शकता किंवा रेड रोजेस किंवा आईला आवडणारी खासं फुलं गिफ्ट करुन तुम्ही तिच्या चेहऱ्यावर स्मित फुलवू शकता. सकाळी आई उठण्यापूर्वी तिच्या उशाशी फुलांचा गुच्छ ठेवून तुम्ही तिला सरप्राईज देऊ शकता.
2. स्पा अपॉईंटमेंट
वर्षानुवर्षे आपल्यासाठी राबणारी आई आणि दिवसभर आपल्यासाठी राबणारी आई आठवली की तिला स्वतःसाठी मोकळा वेळ कधी मिळाला हे आठवून पहा. सातत्याने आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार करणाऱ्या आईला स्वतःचा विचार करण्याची, स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी द्या. आईसाठी स्पा अपॉईंटमेंट बुक करुन तिला सरप्राईज द्या. त्यानिमित्ताने आईला स्वतःसाठी वेळ मिळेल, रिलॅक्स होता येईल आणि तिचा लूक बदलण्यासाठी मदत होईल.
3. डिनर डेट
आईच्या आवडत्या ठिकाणी तिला जेवायला घेऊन जाणं, ही देखील तिच्यासाठी उत्तम ट्रीट ठरेल. तुम्हालाही तिच्यासोबत छानसा वेळ घालवता येईल. मनमोकळ्या गप्पा होतील आणि आईला देखील खूप बरं वाटेल. तसंच स्वयंपाक करण्याला सुट्टी मिळेल, ते वेगळंच.
4. कस्टमाईज मेसेजेस
तुम्ही जे काही आहात, त्यात तुमच्या आईचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तिला आपण जितके देऊ तितके थोडेच. पण मदर्स डे निमित्त एखादा खास मनापासून लिहिलेला संदेश तिचे मन हेलावून टाकेल. हा संदेश आईला धन्यता देईल. त्यामुळे तुमच्या क्रिएटीव्हीला थोडी चालना द्या, इंटरनेटची थोडी मदत घ्या आणि आईसाठी खास संदेश लिहा. मग तो संदेश तुम्ही किचेन, पिलो, ग्रिटींग, फ्रेम कशावरही लिहून देऊ शकता.
5. ई-बुक रिडर
आईला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही तिला एखादे पुस्तक गिफ्ट करु शकता. पण ई-बुकची आयडिया जरा हटके आहे.
यंदा मदर्स डे निमित्त थोडा वेगळा विचार करुन आईला काहीतरी हटके गिफ्ट द्या. आईवर प्रेमाचा वर्षाव करा आणि तिला स्पेशल ट्रीटमेंट द्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)