Matru Din Wishes In Marathi: मातृदिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत खास करा आईचा दिवस!
पिठोरी अमावस्या हे व्रत केवळ उपवास नसून आई आणि मूल यांच्यातील नात्याचा, तसेच नारीशक्तीच्या पूजेचा उत्सव मानला जातो. म्हणूनच आज आईचा सन्मान करत तिच्यासाठी या दिवसाचं औचित्य साधून खास मेसेज करा.
भारतात हिंदू संस्कृतीनुसार, पिठोरी अमावस्या (Pithori Amavasya) ही आई आणि मूल यांच्यातील प्रेमाचे तसेच नारीशक्तीच्या पूजेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळेच अनेक ठिकाणी हा दिवस पारंपरिक मातृदिन (Matru Din) म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या पिठोरी अमावस्या 10 सप्टेंबरला आहे. या मातृदिनाचं औचित्य साधून अनेक कुटुंबांमध्ये पूजाविधी, व्रत आणि मातृशक्तीच्या सन्मानाचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मग तुम्हीदेखील या निमित्ताने आपल्या आईंना, सासूबाईंना आणि आयुष्यातील प्रत्येक मातृशक्तीला शुभेच्छा देण्यासाठी हे काही खास संदेश WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Images द्वारा शेअर करत मातृदिनाचा हा एक दिवस खास करू शकता.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी अनेक कुटुंबांत आई आपल्या मुलांसाठी उपवास करते आणि देवी पिठोरीची पूजा करते. या दिवशी आईला केवळ शुभेच्छा संदेश पाठवण्याऐवजी तिच्यासोबत वेळ घालवणे, तिच्या पूजाविधीत सहभागी होणे आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे या सणाचे खरे सार आहे.
मातृदिनाच्या शुभेच्छा

तुझ्या त्यागाला कधी मोजमाप नाही.

शब्दांत मावेना तुझे उपकार.
आई, तुला मातृदिनाच्या शुभेच्छा

तिच्या मिठीत सारं जग सामावलेलं असतं.
मातृदिनाच्या शुभेच्छा, आई!

मातृदिनाच्या शुभेच्छा, आई!
(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2026 07:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

