Margashirsha Guruvar Vrat Udyapan Vidhi: मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे उद्यापन यंदा चौथ्या की पाचव्या गुरूवारी? जाणून घ्या विधी आणि तारीख
11 जानेवारीला अमावस्या असल्याने अनेकींना शेवटचा गुरूवार कधी? असा प्रश्न पडला आहे.
मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या (Margashirsha Guruvar) शेवटच्या गुरूवारी यंदा अमावस्या असल्याने नेमका उद्यापन विधी कधी करायचा? असा प्रश्न अनेकींना पडला आहे. काही जणी 11 जानेवारीला अमावस्या असल्याने आज 4 जानेवारीलाच शेवटचा गुरूवार करून उद्यापन (Udyapan) करणार आहेत तर काही जणी पाचव्या गुरूवारी म्हणजे 11 जानेवारीला उद्यापनाचा विधी करणार आहे. दरम्यान आनंद पिंपळकरांच्या सल्लानुसार, अमावस्या संध्याकाळी संपणार आहे. त्यामुळे ज्यांना अमावस्येनंतर उद्यापन करायचं आहे ते 11 जानेवारीच्या दिवशी देखील सवाष्ण भोजन आणि उद्यापनाचा विधी करू शकता. अमावस्या अशुभ नसते त्यामुळे यादिवशीही उद्यापन करण्यामध्ये काहीही हरकत नाही. Margashirsha Guruvar 2022 Marathi Wishes: मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारा देत खास करा आजचा दिवस!
पहा आनंद पिंपळकर यांचा सल्ला
महालक्ष्मीव्रत उद्यापनाचे विधी काय?
- संध्याकाळी महिलांना, कन्यांना फळं देण्याची पद्धत आहे. दरम्यान या महिला लक्ष्मीच्या स्वरूपात तुमच्या घरात येतात त्यामुळे त्यांना जमिनीवरा बसवू नये. त्यांना असनावर बसवून त्यांना हळदी कूंकू द्या .
- प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीच्या घटाची पूजा केल्यानंतर दुसर्या दिवशी आंघोळ करून देवीला नमस्कार करून घरात शांतता, आनंद रहावा याची प्रार्थना करा.
- त्यानंतर घटावरील नारळ हलवा. दरम्यान गजरा, वेणी, फुलं केसांमध्ये माळावा.
- दुर्वा, निर्माल्य, नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकाता. किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता.
- सुपारी, नारळ तुम्ही आहारात वापरू शकता. मात्र कापड किंवा साडी असल्यास ती गरजवंताला दान करू शकता. काही जण नारळ लाल कपडामध्ये बांधून ठेवू शकता.
- कलशामधील पाणी तुम्ही तुळशी वृंदावनामध्ये ओतू शकता.
- हळदी कुंकू देवासाठी न वापरता थेट व्यक्तिगत वापरासाठी उपयोगामध्ये आणू शकता.
दरम्यान मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या शेवटच्या दिवशी सवाष्ण महिलेला महालक्ष्मीच्या रूपात मानून तिला हळदी कुंकू आणि वाण म्हणजेच भेटवस्तू दिली जाते. मसाले दूध दिले जाते. मार्गशीर्ष हा पवित्र महिना म्हणून पाळला जातो. दर गुरूवारी घरात घट बसवून त्याची विधिवत पूजा केली जाते. तसेच श्रावण महिन्याप्रमाणे या महिन्यातही मांसाहार टाळला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2024 10:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

