Makar Sankranti Haldi Kunku Invitation Format in Marathi: मकर संक्रातीच्या हळदी कुंकू समारंभासाठी 'निमंत्रण पत्रिका' WhatsApp, SMS द्वारा शेअर करत सख्यांना द्या आमंत्रण
यंदाही तुमच्या मैत्रिणींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करणार असाल तर या खास आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण देऊ शकता.
जानेवारी महिना आला की नव्या वर्षात पहिला सण हा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) साजरा केला जातो. नव्या वर्षात नवी आशा-आकांक्षा उरी बाळगून केलेली सुरूवात महिला मैत्रिणींसोबत साजरी करताना या सणाचं औचित्य साधत हळदी कुंकवाचे कार्यक्रम (Haldi Kunku) केले जातात. हळदी कुंकवाला वाण लुटण्याची रीत असते. प्रामुख्याने नववधूसाठी हा सण खास असतो. मग यंदाही तुमच्या मैत्रिणींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करणार असाल तर या खास आमंत्रण पत्रिकेच्या नमुन्यांचा वापर करून WhatsApp द्वारा, SMS द्वारा निमंत्रण देऊ शकता.
मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त घरोघरी महिलांना एकत्र आणण्यासाठी त्यांना हळदी कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम केला जातो. साधारण हा कार्यक्रम मकरसंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही आयोजित केला जाऊ शकतो. यंदा मकर संक्रात 14 जानेवारी दिवशी तर रथसप्तमी हा सण 28 जानेवारी दिवशी आहे. त्यामुळे या दिवसांत हळदी कुंकवानिमित्त महिलांची धामधूम सुरू राहणार आहे. नक्की वाचा: Makar Sankranti 2023 Dos For Good Luck: मकर संक्रांतीला या गोष्टी दान केल्यास घरात नांदेल लक्ष्मी, कधीही येणार नाही आर्थिक संकट, पाहा यादी .
मकरसंक्रांत हळदी कुंकू समारंभ आमंत्रण
दरवर्षी प्रमाणे यंदाही सोसायटीमधील सार्या महिलावर्गासाठी
मकरसंक्राती मधील हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत त्याची शोभा वाढवावी
विनित,
दिनांक-
स्थळ -
मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा
मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त सार्या एकत्र येऊन
साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा
------------------------------
नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या
शुभेच्छा देऊ गळाभेट घेत मकरसंक्रांतीच्या!
मकर संक्रांतीनिमित्त 15 जानेवारी दिवशी आयोजित हळदी-कुंकू सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नक्की घरी या आणि वाण लूटण्याचा आनंद घ्या
पत्ता-
--------------------
मकरसंक्रांतीला अनेकजणी काळी साडी नेसून हा सण साजरा करतात. त्यासोबतच हलव्याचे दागिने बनवून ते परिधान करण्याची देखील रीत आहे. जावयाचे देखील या सणानिमित्त कोडकौतुक केले जाते.