Makar Sankranti 2021 Tilgul Recipe: यंदा मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा 

बऱ्याच महिला घरी तिळाचे लाडू करतात.मात्र तिळगुळ म्हणजेच ज्याला हलवा ही म्हटले जाते ते घरी जास्त करताना पहायला मिळत नाही.

Photo Credit : Instagram

नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच जानेवारीमधला पहिला सण असतो मकर संक्रांत. पहिला सण असल्याने त्याची उत्सुकता ही तेवढीच असते. अवघ्या काही दिवसांवर हा सण आला आहे. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होणार आहे.मकर संक्रांती हा हिंदूंचा मुख्य उत्सव आहे.पौष महिन्यात मकर राशीवर सूर्य येतो तेव्हाच हा सण साजरा केला जातो.मकर संक्रांत वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांत च्या दिवशी सुगाडीत काही ठराविक गोष्टी, पदार्थ ठेऊन त्याची पूजा केली जाते. (Makar Sankranti 2021: यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख आणि पुजेची शुभ वेळ )

मकर संक्रांत सर्वात जास्त महत्व असते ते तिळगुळ म्हणजेच हलवा आणि तिळाच्या लाडू ला.थंडीच्या दिवसात तीळ शरीरासाठी चांगले ही असतात. बऱ्याच महिला घरी तिळाचे लाडू करतात.मात्र तिळगुळ म्हणजेच ज्याला हलवा ही म्हटले  जाते ते घरी जास्त करताना पहायला मिळत नाही.त्याचे कारण ते बनवण्याची योग्य पद्धत सगळ्यांना महितच असते असे नाही.आणि बऱ्याच महिला ते घरी नीट बनवायला जमणार नाही हा विचार करुन घरी बनवण्यापेक्षा बाजरातून विकत आणणे पसंत करतात.पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की घरी रंगेबिरंगी आणि काटेरी हलवा कसे तयार करता येतील.पाहा खाली दिलेले व्हिडिओ.

काटेरी आणि रंगेबिरंगी हलवा

हलव्याची सोपी रेसिपी

तिळाचा हलवा

तेव्हा यंदा घरच्या घरी फक्त तिळाचे लाडू न बनवता त्याच्या सोबतीला वर दिलेले व्हिडिओ पाहुन तिळगुळ ही करुन पाहा. लेटेस्टली मरठीकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खुप शुभेच्छा