IPL Auction 2025 Live

Maha Shivratri 2020 Puja Vidhi: भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात?

यादिवशी भगवान शंकराची आराधना करण्यासाठी त्याचे भक्त उपवास करतात. यासोबतच शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर दूध-पाणी आणि बेलपत्राचा अभिषेक करतात.

Bel patra on Maha Shivratri (Photo Credits: File image)

Maha Shivratri 2020:  भगवान शंकर यांचा भक्तांसाठी महाशिवरात्रीचा (Maha Shivratri) दिवस हा अत्यंत खास असतो. यंदा महाशिवारात्र 21 फेब्रुवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. यादिवशी भगवान शंकराची आराधना करण्यासाठी त्याचे भक्त उपवास करतात. यासोबतच शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर दूध-पाणी आणि बेलपत्राचा अभिषेक करतात. या वस्तू शंकराला प्रिय असल्याने त्या अर्पण करण्याचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीची पूजा (Maha Shivratri 2020 Puja) करणार असाल तर शंकराकडे मागितलेली इच्छा, तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बेलपत्र, दूध अर्पण करणं हितावह आहे अशी शिवभक्तांची आराधना आहे.

धार्मिक कथांनुसार, समुद्रमंथनामध्ये भगवान शंकराने विष प्राशन केलं होतं. यामुळे त्यांचा गळा निळा पडला होता. दरम्यान विषप्राशनामुळे त्यांच्या घशामध्ये जळजळ झाली होती. त्यावेळी घशामध्ये थंडावा निर्माण व्हावा म्हणून बेलपत्र देण्यात आले होते. भगवान शंकराच्या डोक्यावर बेलापत्र ठेवल्याने थंडावा निर्माण झाला होता. त्यामुळे शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने गरीबी दूर होते आणि नशिब फळफळते. बेलाचे झाड देखील वैभवतेचे प्रतिक समजले जाते. लक्ष्मी देवी देखील बेलाच्या झाडामध्ये वास करते अशी धारणा आहे. त्यामुळे तुमच्या घराजवळदेखील बेलाचं झाड लावण फायदेशीर समजलं जातं. यामुळे संबंधित व्यक्तीच्या आयुष्यात पैशांची भरभराट होते असे समजले जाते.

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काय कराल?

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी बेलाची पानं शंकराला अर्पण करायला विसरू नका. तुमच्या घरामध्ये बेलपत्रं शंकराला अर्पण करणार असाल तर त्याला घरीच ठेवा. अनेकजण बेलपत्र सुकवून घरात लॉकरमध्ये ठेवतात. किंवा पुस्तकामध्ये ठेवतात.