Lokmanya Tilak Punyatithi 2021 HD Images: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Photos शेअर करून करा अभिवादन

टिळकांच्या निधनाला इतकी वर्षे उलटूनही आजही त्यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात. म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे कही एचडी इमेजेस देत आहोत. ज्यात लोकमान्य टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांचे विचार आहेत. या इमेजेस आपण Facebook Status, WhatsApp Status म्हणून ठेऊ शकता.

Lokmanya Tilak Punyatithi 2021 HD Images: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Photos शेअर करून करा अभिवादन
Lokmanya Tilak Punyatithi (File Image)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) यांची आज पुण्यतीथी (Lokmanya Tilak Punyatithi 2021). 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मुळ नाव केशव होते. मात्र लहानपणापासूनच ते बाळ नावाने ओळखले जाऊ लागले. त्यामुळे भविष्यातही ते मोठे झाल्यावर देशभरात ते बाळ नावानेच ओळखले जाऊ लागले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांनी योगदान दिले. त्यांपैकी टीळक हे एक होत. 1 ऑगस्ट 1920 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज (1 ऑगस्ट) त्यांची पुण्यतिथी (Lokmanya Bal Gangadhar Tilak Death Anniversary). टिळकांच्या निधनाला इतकी वर्षे उलटूनही आजही त्यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात. म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे कही एचडी इमेजेस देत आहोत. ज्यात लोकमान्य टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) यांचे विचार आहेत. या इमेजेस आपण Facebook Status, WhatsApp Status म्हणून ठेऊ शकता.

लोकमान्य टिळक यांचे कार्य पाहून लोकांनी त्यांना लोकमान्य (Lokmanya)ही पदवी बहाल केली. लोकमानय टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak) हे थोर राजकारणी, समाजिक कार्यकर्ते, लोकनेते होते. तसेच ते आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडितही होते. त्यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटीशांविरोधात लोखणी चालवली. केसरीतील एका लेखामध्ये तर त्यांनी 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का' असा अग्रलेख लिहीला. या लेखावरुन संतप्त झालेल्या ब्रिटिशांनी त्यांना मंडाले येथील तुरुंगात पाठवले. तेथे त्यांनी गितारहस्य हा ग्रंथ लिहिला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

Lokmanya Tilak Punyatithi (File Image)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

Lokmanya Tilak Punyatithi (File Image)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

Lokmanya Tilak Punyatithi (File Image)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

Lokmanya Tilak Punyatithi (File Image)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी

Lokmanya Tilak Punyatithi (File Image)

लोकमान्य टिळक यांनी बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई (माहेरचे नाव तापीबाई) यांच्याशी विवाह केला. त्या कोकणातील लाडघर गावच्या होत्या. लोकमान्य टिळक यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते. सध्या टिळक यांनी स्थापन केलेल्या केसरी हे वृत्तपत्र त्यांचे नातू ज.श्री.टिळक हे चालवतात. तेच वृत्तपत्राचे संपादक आहेत. ते राज्यसभेत खासदारही राहिले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2021 08:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).