Last-Minute Ganpati Darshan Invitation Messages For Ganesh Chaturthi 2022:आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना पाठवण्यासाठी गणेशोत्सवाची आमंत्रण पत्रिका, पाहा
दरम्यान तुम्ही गणेशोत्सवाचं आमंत्रण WhatsApp Messages द्वारा पाठवू शकतात. आम्ही तुमचे काम आणखी सोपे करण्यासाठी आमंत्रण पत्रिकेचा नमुना मजकूर घेऊन आलो आहोत, पाहा
Last-Minute Ganpati Darshan Invitation Messages For Ganesh Chaturthi 2022: गणरायांच्या आगमाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे.भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची पूजा करण्याची पद्धत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची मूर्ती आणून बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. आगमनापासून विसर्जन पर्यंत बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. १० दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते, अनेक सार्वजनिक ठिकाणीही बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सार्वजनिक ठिकाणी १० दिवस वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतले जातात, आरती केली जाते आणि गणेशोत्सवाचे १० दिवस जल्लोषात साजरे केले जातात. मागील 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अत्यंत सध्या पद्धतीने उत्सव साजरे केले गेले. परंतु आता सगळे निर्बंध उठवल्यानंतर उत्साह आणखी वाढणार यात काही शंका नाही. 31 ऑगस्टला गणेश चतुर्थीला सर्वत्र गणपती बाप्पांचे धुमधडाक्यात आगमन होणार आहे. दरम्यान तुम्ही गणेशोत्सवाचं आमंत्रण WhatsApp Messages द्वारा पाठवू शकतात. आम्ही तुमचे काम आणखी सोपे करण्यासाठी आमंत्रण पत्रिकेचा नमुना मजकूर घेऊन आलो आहोत, म्हणजे तुमचे काम आणखी सुकर होईल.[ हे देखील वाचा: Ganpati Aarti in Marathi: गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना केल्यानंतर Lata Mangeshkar यांच्या आवाजासह म्हणा गणरायाची आरती, Watch Video]
पाहा, आमंत्रण पत्रिका
निर्बंध उठवले असले तरीही गर्दीमुळे कोरोनाच्या रुग्नसंख्येत वाढ होऊ शकते त्यामुळे त्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जातांना त्रिसूत्रीचे पालन करा आणि बाप्पाचा उत्सव जल्लोषात साजरा करा.