Last Margashirsha Guruvar: महालक्ष्मी मंत्र, आरती यांच्या मंगलमय घोषात करा आज मार्गशीर्ष व्रताची सांगता

Margashirsha Guruvar Vrat 2020 Wishes | Photo credits File Images

यंदाच्या मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या (Margashirsha Guruvar Vrat) मालिकेची आज (7 जानेवारी) सांगता होत आहे. आजचा शेवटचा गुरूवार असल्याने महिला वर्गामध्ये विशेष उत्साह आहे. दरम्यान मार्गशीर्ष महिन्यात दर गुरूवारी वैभवलक्ष्मीची पूजा करून, घट मांडणी करून लक्ष्मी मातेला प्रसन्न करून तिचा कृपा आशिर्वाद कायम रहावा यासाठी प्रार्थना केली जाते. तर शेवटच्या गुरूवारी घरोघरी महिला एकमेकींकडे जाऊन हळदी कुंकवाचे कार्यक्रम देखील केले जातात. दरम्यान हा दिवस उपवासचा असल्याने मसाले दूध आणि उपवासाच्या फराळाच्या पदार्थांची या निमित्ताने रेलचेल असते. मग अशा मंगलमय दिवशी घरात वातावरण प्रसन्न रहावं म्हणून महालक्ष्मी मंत्र, आरती, भक्तीगीतं लावून देखील आजचा दिवस स्पेशल करू शकता. त्यासाठी तुम्हांला युट्युबवर काही ऑनलाईन व्हिडिओ सहज मिळू शकतील. Margashirsha Guruvar Vrat Puja 2020: मार्गशीर्ष गुरूवार दिवशी महालक्ष्मीचा घट आकर्षकरित्या असा सजवा (Watch Video).

 

महालक्ष्मी आरती

महालक्ष्मी मंत्र

मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरूवारी घरामध्ये घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पुजा केली जाते. तर शुक्रवारी सकाळी या घटाचे उद्यापन केले जाते. सकाळी घटाची मांडणी केल्यानंतर सकाळ - संध्याकाळ पूजा केली जाते. तसेच गोडाचा पदार्थ बनवून नैवेद्याच्या स्वरूपात दाखवून दिवसभराचा उपवास सोडला जातो.