Lalita Panchami 2025 Wishes In Marathi: आज ललिता पंचमी; प्रियजनांना हे खास शुभेच्छा संदेश, WhatsApp Status पाठवून द्या शुभेच्छा!
ललिता देवीच्या उपासनेसाठी समर्पित असून, या दिवशी भाविक उपांग ललिता नावाचे विशेष व्रत पाळतात. नवरात्रीच्या काळात येणाऱ्या या पंचमी तिथीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे.
Lalita Panchami 2025 Wishes In Marathi: २६ सप्टेंबर २०२५ रोजी, अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी (पंचमी तिथी) ललिता पंचमी हा शुभ दिवस साजरा केला जात आहे. हा दिवस विशेषतः ललिता देवीच्या उपासनेसाठी समर्पित असून, या दिवशी भाविक उपांग ललिता नावाचे विशेष व्रत पाळतात. नवरात्रीच्या काळात येणाऱ्या या पंचमी तिथीला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जे भक्त उपांग ललिताचे व्रत करतात त्यांना सुख-समृद्धी, यश आणि समाधान प्राप्त होते. देवी आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. ललिता देवीला दक्षिण भारतात चंडी म्हणूनही ओळखले जाते.
या शुभदिनी तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा पाठवून हा खास दिवस साजरा करू शकता.
लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपतीचा वास असो
आणि मां दुर्गेचा आशिर्वाद असो
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवरात्रीच्या या मंगल समयी देवी
तुम्हाला सुख, समाधान,
आनंद आणि यश प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो...
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सतत बरसत राहो
आणि तुमचे जीवन आनंदमय होवो...
हीच मातेकडे प्रार्थना…
ललिता पंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
नवी कल्पना, नवी ज्योत्स्ना
नवी शक्ती, नवी आराधना
ललिता पंचमीच्या शुभ प्रसंगी
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना
सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी
आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना…
ललिता पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोण आहेत देवी ललिता?
देवी ललिता ही त्रिपुरा सुंदरी आणि षोडशी या नावांनीही ओळखली जाते. हिंदू धर्मानुसार, देवी ललिताला दोन हात असून ती कमळावर विराजमान आहे. तिचा विवाह भगवान शंकराशी झाला होता.