Lalbaugcha Raja 2019: लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा यंदा 20 जूनला; lalbaugcharaja.com सह सोशल मीडियावर पहा लाईव्ह स्ट्रीमिंग

2016 Lalbaghcha Raja (Photo Credits: Official Website)

Lalbaugcha Raja Padya Pujan 2019:  मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव हा लालबागच्या राजाशिवाय अपुरा आहे. जून महिन्याला सुरूवात झाली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात. यंदा लालबागच्या राजाचं पाद्यपूजन 20 जूनला होणार आहे. लालबागच्या राजा हा लालबाग परिसरातील मसाला गल्ली भागात बसवला जातो. त्यामुळे त्याची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचं विशेष महत्त्व आहे. इथे पहा: ८५ वर्षातील लालबागच्या राजाचं बदलतं रूप

कुठे पहाल लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा 2019

लालबागच्या राजाचे केवळ मुंबईत नव्हे तर देशा परदेशात भाविक आहेत. त्यांच्यासाठी लालबागचा राजा मंडळाने पाद्यपूजन सोहळा फेसबूक, वेबसाईट आणि युट्युब चॅनेलवर पाहू शकणार आहेत.

20 जून दिवशी दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे.

लालबागच्या राजाची मूर्ती संतोष कांबळी आणि त्यांचे कुटूंबीय घडवतात. 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून त्याची ओळख असल्याने दहा दिवस अहोरात्र त्याच्या दर्शनाला गर्दी करतात.