Khairatabad Ganesh Immersion 2019 Live Streaming: देशातील सर्वात उंच गणपती, खैरताबाद गणेश विसर्जन मिरवणुकीचा थाट; पहा थेट प्रक्षेपण
त्यानंतर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी सुरु झाली. दूरध्वनी भवन, सचिवालय मार्गे, एनटीआर मार्गावरून ही मिरवणूक जीएनएमएमआर डीआरएफ मंडळाच्या समोरील अप्पर टँकबंद येथे पोहचेल.
आज गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2019) शेवटचा दिवस, गेले 11 दिवस चालू असलेल्या या उत्सवाची सांगता आज गणपती विसर्जनाने होत आहे. मुंबई-पुणे यांसह देशातील विविध ठिकाणी ही विसर्जनाची धूम पाहायला मिळत आहे. हैद्राबाद येथील भारतातील सर्वात उंच गणपती, खैरताबाद गणपतीची मिरवणुकही थाटामाटात सुरु झाली आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खैरताबाद गणेशाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली. दिवसभर शहरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेतला सकाळी लवकर ही विसर्जन मिरवणूक सुरु करण्यात आली.
यासाठी शहरभर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तब्बल 61 फुट गणपतीची शेवटची झलक पाहण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. यावर्षी साधारण 35 लाख भाविकांनी या गणपतीचे दर्शन घेतले होते. आज सकाळी 6.30 च्या सुमारास ही भव्य 61 फूट गणेश मूर्ती ट्रॉलीवर ठेवण्यात आली. शोभायात्रासाठी अत्याधुनिक क्रेन वापरली जात आहे. या ट्रॉलीला 26 टायर्स असून, 55 टन वजन पेलण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.
या ठिकाणी पाहू शकता खैरताबाद गणपतीची विसर्जन मिरवणूक -
खैरताबाद गणेश उत्सव समितीने बुधवारी रात्रीपासूनच गणेश दर्शन बंद केले होते. त्यानंतर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी सुरु झाली. दूरध्वनी भवन, सचिवालय मार्गे, एनटीआर मार्गावरून ही मिरवणूक जीएनएमएमआर डीआरएफ मंडळाच्या समोरील अप्पर टँकबंद येथे पोहचेल. टँकबंड येथे अंतिम पूजा झाल्यानंतर या गणपतीचे विसर्जन केले जाईल.
दरम्यान, ही विशाल मूर्ती घडवण्यासाठी 150 कामगार आणि 4 महिन्याचा काळ लागला आहे. तसेच ही मूर्ती घडवण्यासाठी साधारण 1 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे, मूदिराज यांनी सांगितले. तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील कारागिरांना ही मूर्तीसाठी घडवण्यासाठी बोलवण्यात आले होते. या मूर्तीला 12 मूख आणि 24 हात देण्यात आले आहेत. प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत.