Janmashtami 2020 Poha Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रसादासाठी दहीपोहे कसे बनवाल? पहा रेसिपी
काही ठिकाणी गुळपोह्यांचाही प्रसाद असतो.
आज मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी देशभरात जन्माष्टमीचा उत्साह आहे. मथुरा, द्वारका, वृदांवन, जगन्नाथपुरी या ठिकाणी जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. महाराष्ट्रातही कृष्ण मंदिरांसह घरोघरी आज रात्री 12 वाजता बाळकृष्णाची पूजा केली जाईल. पाळणा सजवून त्यात बाळकृष्णाची मुर्ती ठेवून पाळणा गायला जातो. जन्माष्टमी दिवशी कृष्णाला प्रिय असणारं दही आणि कृष्णसखा सुदामा याच्या प्रेमाच्या गोडीने परिपूर्ण पोहे प्रसादासाठी दिले जातात. काही ठिकाणी गुळपोह्यांचाही प्रसाद असतो. परंतु, प्रसादासाठी लागणारे पोहे नेमके कसे बनवायचे? पाहुया त्याची रेसिपी...
प्रातांनुसार दही पोह्यांचा प्रसाद बनवण्याची पद्धत वेगळी असेल. काही ठिकाणी गुळ पोहे देखील प्रसादासाठी दिले जातात. पोहे धुवून त्यात गुळ आणि खोबरं घाला. गुळ पोह्यांचा प्रसाद तयार. दही पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे धुवून घ्या. त्यात साखर आणि दही घालून नीट मिक्स करा. त्यानंतर दही पोह्यांच्या प्रसादाचा आस्वाद घ्या. यात तुम्ही नवीन प्रयोग करुन व्हेरिएशन्स आणू शकता. (गोकुळाष्टमी दिवशी कृष्ण जन्मोत्सवाला बाळकृष्णाचा पाळणा आकर्षक रित्या कसा सजवाल?)
रेसिपी व्हिडिओज:
यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे एकत्रितपणे जन्माष्टमीचा उत्सव साजरा करता येणार नाही. राज्यात मंदिरंही अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. तसंच दहीहंडीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. मात्र घरच्या घरी श्रीकृष्णाची पूजा करून यंदाचा जन्माष्टमीचा सण आनंदात साजरा करा.