Janmashtami 2020 Live Darshan From Mathura & Dwarka:जन्माष्टमी 2020 च्या रात्री कृष्ण जन्मोत्सव सोहळा DD National सह युट्युबवर इथे पहा लाईव्ह

तर युट्युबवरही त्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. हे लाईव्ह स्ट्रिमिंग 12 ऑगस्टच्या रात्री 11वाजून 25 मिनिटांनी सुरू होणार आहे.

Lord Krishna (Photo Credits-Facebook)

जन्माष्टमीचा सोहळा भारतभर भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो. हिंदू पुराणानुसार विष्णूचा आठवा अवतार असलेला श्रीकृष्ण पृथ्वीवर श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी जन्माला आला. यंदा जन्माष्टमी (Janmashtami) म्हणजेच गोकुळाष्टमी (Gokulashtami) हा कृष्ण जन्मोत्सव 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार आहे. दरवर्षी जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णाची सारी मंदिरं सजतात,भाविकांची गर्दी असते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे ही धामधूम कमी आहे. मोजक्याच पुजार्‍यांच्या उपस्थितीमध्ये मथुरेसह देशभरातील इस्कॉनच्या मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. भारतामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतात मथुरा, वृंदावन, द्वारका येथे कृष्ण जन्माची धूम असते. मथुरा आणि द्वारका ही भगवान श्रीकृष्णाच्या भाविकांसाठी महत्त्वाची आणि पवित्र स्थळं आहेत. यंदा अनेकांना द्वारका आणि मथुरामध्ये जाणं शक्य नाही पण डीडी नॅशनल आणि युट्युबवर या दोन्ही ठिकाणची पूजा, कृष्ण जन्म उत्सव पाहता येणार आहे. Krishna Janmashtami 2020: मथुरेच्या कृष्ण जन्मस्थान मंदिर ते देशभर इस्कॉन मंदिरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे भगावान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी असलेल्या मंदिरामध्ये मोठ्या धामधुमीत जन्माष्टमी साजरी केली जाते. तर द्वारका ही श्रीकृष्णाची कर्मभूमी मानली जाते. भारतातील प्राचीन शहरांमध्ये याचा समावेश आहे.

कृष्ण जन्मोत्सव लाईव्ह स्ट्रिमिंग

द्वारका आणि मथुरेमधील कृष्ण जन्मोत्सव हा टेलिव्हिजन वर डीडी नॅशनलवर दाखवला जाणर आहे. तर युट्युबवरही त्याचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. हे लाईव्ह स्ट्रिमिंग 12 ऑगस्टच्या रात्री 11वाजून 25 मिनिटांनी सुरू होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदा इस्कॉन मंदिरात भाविकांची गर्दी नसेल मात्र इस्कॉन कडूनही त्यांच्या अधिकृत वेबसाईट्स, फेसबूक पेजवर लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवले जाणार आहे. इस्कॉन मंदिरातील सोहळा 12  ऑगस्टला पहाटे 4.30 पासून 13 ऑगस्टच्या रात्री 1 वाजेपर्यंत भाविकांना पाहता येणार आहे.