Is 26th August a School Holiday: ईद-ए-मिलाद-उन-नबी ची शाळांना 26 ऑगस्टची सुट्टी आहे का?

महाराष्ट्र शासनासह इंडिया पोस्टच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत 26 तारखेला सुट्टी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय तसेच बहुतांश खासगी शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये या दिवशी बंद राहतील.

Is 26th August a School Holiday: ईद-ए-मिलाद-उन-नबी ची शाळांना 26 ऑगस्टची सुट्टी आहे का?

ईद-ए-मिलाद-उन-नबी (Eid Milad-un-Nabi) हा दिवस पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव प्रार्थना, दानधर्म आणि पैगंबरांच्या शांतता, करुणा आणि सहिष्णुतेच्या शिकवणुकींचे स्मरण करतात. मग या दिवशी शाळा, कॉलेज, बॅंका आणि शासकीय कार्यालयं बंद असतील का? हा प्रश्न तुम्हांलाही पडला असेल तर जाणून घ्या 26 ऑगस्टला खरंच  सुट्टी आहे का?

26 ऑगस्टला ईद-ए-मिलाद-उन-नबीची सुट्टी आहे का? 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२६ च्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, मिलाद-उन-नबी किंवा ईद-ए-मिलाद (पैगंबर मोहम्मद यांची जयंती) ही सुट्टी बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनासह इंडिया पोस्टच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीतही याच तारखेला सुट्टी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय तसेच बहुतांश खासगी शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये या दिवशी बंद राहतील.

तारखेबाबत थोडा गोंधळ का ?

इस्लामिक कॅलेंडर चंद्राच्या भ्रमणावर आधारित असल्याने आणि चंद्रदर्शनाच्या स्थानिक परंपरांमध्ये फरक असल्याने मिलाद-उन-नबीची नेमकी तारीख प्रदेशानुसार एक दिवस पुढे-मागे होऊ शकते. काही ठिकाणी १२ रबी-उल-अव्वल, तर काही ठिकाणी १७ रबी-उल-अव्वल रोजी हा दिवस साजरा केला जातो. मात्र भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत २६ ऑगस्ट हीच तारीख निश्चित करण्यात आली आहे. नक्की वाचा: Eid Milad-un-Nabi 2026 Date in India: भारतात यंदा ईद-ए-मिलाद-उन-नबी कधी? कशी साजरी केली जाते घ्या जाणून 

शाळा आणि पालकांनी अंतिम सुटीबाबत आपल्या संबंधित शिक्षण मंडळ किंवा शाळेच्या अधिकृत सूचनेची खातरजमा करावी, कारण काही स्थानिक प्रशासन चंद्रदर्शनानुसार तारखेत बदल करू शकते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2026 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).