International Mother Language Day 2019: भारतीय भाषांबद्दल या '10' खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
आपला देश तर विविध भाषांनी समृद्ध आहे.
International Year of Indigenous Languages: 21 फेब्रुवारी हा दिवस 'इंटरनॅशनल मदर लेंगवेज डे' (International Mother Language Day) म्हणून सेलिब्रेट केला जातो. म्हणजेच जागतिक मातृभाषा दिवस. आपला देश तर विविध भाषांनी समृद्ध आहे. भारतीय संविधानाच्या आठव्या शेड्यूलमध्ये 22 भाषा असल्याचे सांगितले आहे. भारतीय संविधानाने कोणत्याच भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला नसला तरी प्रजासत्ताक भारतात केंद्र सरकार अधिकृतपणे हिंदी भाषेचा वापर करते.
भारतातील तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्यालम आणि ओडीया भाषेला तब्बल 1500-2000 वर्षांची परंपरा आहे. भारतातील सर्व भाषांची चार वर्गात वर्गवारी होते: इंडो-आर्यन, ड्राव्हिडियन, सिनो-तिबेटीयन आणि अफ्रो-एशियाटिक. तर अंदमान बेटावर बोलली जाणारी भाषा वेगळीच मानली जाते. इंटरनॅशनल मदर लेंगवेज डे निमित्त भारतीय भाषांबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया...
1. हिंदी ही जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी दुसरी बोलीभाषा आहे. तर बंगाली भाषेचा 7 वा आणि पंजाबी भाषेचा 10 वा क्रमांक लागतो:
# जगभरातील सुमारे 970 मिलियन लोक हिंदी भाषा बोलतात. तर बंगाली आणि पंजाबी बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 250 मिलियन आणि 120 मिलियन आहे.
2. हिंदी भाषा प्रत्येक युगातील क्रांतीच्या विविध टप्प्यात वेगवेगळ्या नावाने ओळखली जात होती. यापूर्वी सुरुवातीच्या काळात हिंदी अपभ्रंश Apabhramsa म्हणून ओळखली जात होती.
# कालिदास हा संस्कृतचा भाषेतील विद्वान होता आणि प्राचीन भारतात त्याने अनेक नाटकं लिहिली आहेत. त्यापैकी एक रोमांटिक नाटक म्हणजे विक्रमोरश्वशीम (Vikramorvashiyam ) हे नाटक अपभ्रंश भाषेत इ.स. पूर्व 400 च्या काळात लिहिले होते.
3. मल्यामळ ही भाषा दक्षिण भारतातील केरळ राज्याची भाषा असून Malayalam हा शब्द दोन्ही बाजूने वाचताना सारखाच आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा शब्द आहे जो दोन्ही बाजूने सारखाच वाचला जातो.
4. मुंबईतील एक गुजराती कुटुंब कायम संस्कृतमध्ये संभाषण करत असे तर कर्नाटकातील मॅटूर गावात सर्वजण एकमेकांशी संस्कृतमधून संवाद साधत:
संस्कृत भाषेबद्दलच्या अजून काही खास गोष्टी:
# नासा शास्त्रज्ञ रिक ब्रिग्सने एकदा म्हणाले होते की, संस्कृत ही अस्तित्वात असणारी एकमेव अस्पष्ट भाषा आहे.
# संस्कृत ही कंम्प्युटर फ्रेंडली भाषा आहे.
# जर्मनीमधील 14 विद्यापिठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते.
# उत्तराखंड राज्याची राज्यभाषा संस्कृत आहे.
# संस्कृत भाषेचा उगम लॅटीन भाषेच्या कुटुंबातून झाला आहे असे मानले जाते. त्यामुळेच दोन्ही भाषेतील अनेक शब्दांचा शेवट 'अम' ने होतो.
# संस्कृत प्रत्येक शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. उदाहरणार्थ, 'हत्ती' शब्दासाठी 100 समानार्थी शब्द आहेत.
5. ब्रह्ई (Brahui)ही द्राविडियन भाषा असून त्याची मूळ भारतातीलच आहेत. ही भाषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील एकून 1 मिलियन लोक बोलतात:
# द्राविडीयन भाषेत 23 भाषा आहेत. त्यात तमिळ, तेलगू आणि कन्नड यांसारख्या भाषांचा समावेश होतो. या भाषात दक्षिण भारतात प्रामुख्याने बोलल्या जातात.
6. 1999 मध्ये UNESCO ने 21 फेब्रुवारी हा दिवस इंटरनॅशनल मदर लेंगवेज डे म्हणून साजरा करण्याचे घोषित केले:
बंगाली भाषा चळवळ ही इस्ट बंगाल मध्ये सुरु झालेली राजकीय चळवळ होती. बंगाली भाषेचा सरकार आणि शिक्षणात अधिकृत वापरासाठी आणि पाकिस्तानच्या तत्कालीन वर्चस्वाला विरोध म्हणून बंगाली भाषा चळवळ 1952 मध्ये सुरु करण्यात आली होती. त्याच्या स्मरणोत्सव म्हणून 21 फेब्रुवारी हा दिवस इंटरनॅशनल मदर लेंगवेज डे साजरा करण्याचे UNESCO ने घोषित केले.
7. उर्दु भाषेतील 99% क्रियापदांची मूळ संस्कृत आणि प्राकृत भाषेत आहेत:
# उर्दु ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा असली तरी पूर्वी भारतातील ही ती अधिकृत भाषा होती.
8. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अमेरिकेतील हिंदी भाषेच्या शिक्षणासाठी 114 मिलियन डॉलरचे बजेट ठेवले होते:
# हिंदी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन ही भाषा बालवर्गापासून ते पदवी शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. कारण ही इंडियन अमेरिकन लोकांची सर्वसामान्य वापरातील भाषा होती. मात्र ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर हा प्लॅन तितकासा यशस्वी झाला नाही.
9. सर्व भारतीय भाषांची लिपी ही एकाच भाषेतून उमग पावली आहे ती म्हणजे ब्राह्मी. भारतात लेखन जगातील इतर भागांच्या तुलनेत फार उशिरा आले. त्यामुळे अगदी जुन्या भाषा तमिळ आणि संस्कृतला बोलीभाषेची खूप भक्कम परंपरा आहे.
10. कन्नड भाषेला जगातील दुसरी सर्वात जूनी लेखनाची परंपरा आहे. हजारो लेखनांन या भाषेच्या संपन्नतेत भर घातली आहे:
कन्नड भाषेत लिहिलेल्या एकूण लिपिकांचा वर्तमान अंदाज शैलेन पोलॉक पासून 30,000 हून अधिक असल्याचे साहित्य अकादमीने सांगितले आहे.