Vitthal Rukmini Shaskiya Mahapuja: आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा साठी मानाचे वारकरी दाम्पत्य कसे निवडले जाते?
यंदा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरगाव येथील बाबासाहेब माधव माने (वय ७०) सौ. प्रभावती बाबासाहेब माने (वय ६८) यांनी शासकीय महापूजेमध्ये सहभाग घेतला होता.
संत परंपरेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) पंढरपूरात लाखो भक्त विठ्ठल रखूमाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. आषाढी एकादशीला विठ्ठल-रूक्मिणीच्या महापूजेचा (Vitthal–Rukmini Maha Puja) मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. मुख्यमंत्र्यांसोबतच मानाचे एक वारकरी दाम्पत्य देखील या शासकीय महापूजेमध्ये सहभागी होता. पण या मानाच्या वारकरींची निवड कशी होते? यासाठीचे निकष काय असतात? हा प्रश्न तुम्हांलाही पडला असेल तर जाणून घ्या या मानाच्या वारकरी जोडप्याची निवड नेमकी होते कशी?
विठूरायाच्या महापूजेचे मानकरी जोडपे कसे निवडतात?
पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणीच्या मंदिरामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या महापूजेमध्ये मानाचे वारकरी जोडपे देखील सहभागी होते. त्याची निवड संपूर्णपणे मंदिर प्रशासनाकडून केली जाते. विठूरायाच्या मंदिरात मध्यरात्रीनंतर शासकीय महापूजा सुरू होते. त्यासाठी रांगेत असलेल्या सामान्य वारकर्यांमधून मानाचा वारकरी निवडला जातो. मात्र हा वारकरी एक दाम्पत्य असणं आवश्यक आहे. Ashadhi Ekadashi 2026 Messages: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र, Quotes आणि संदेश.
मानाचा वारकरीं निवड निकष
विठूरायाच्या दर्शन रांगेमध्ये उभं असलेले दाम्पत्य हे मानाचे वारकरी म्हणून निवडले जातात. मंदिर समिती अधिकारी, पोलिस प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी रात्री दर्शन रांगेची पाहणी करून हा मानाचा वारकरी निवडतात. आषाढी वारी अर्थात पायी प्रवास करून आलेले जोडपे या मानाच्या वारकरी जोडप्यासाठी निवडले जाते. विठूरायाची शासकीय महापूजा ही पती-पत्नी एकत्र करत असल्याने मानाचे दाम्पत्य देखील पती-पत्नी म्हणून असलेल्यांपैकीच निवडले जाते.या जोडप्याच्या गळ्यात तुळशीची माळ असल्याचं पाहून आणि नियमित वारी करणार्या जोडप्यालाच निवडले जाते. तसेच या जोडप्याने पूर्वी शासकीय महापूजेमध्ये सहभाग घेतलेला नाही हे तपासून त्याची निवड केली जाते.
1973 पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा करत आहेत. त्यांच्यासोबत दर्शन रांगेतील एक जोडपे या पूजेमध्ये सहभागी होते. शासकीय महापूजेनंतर या मानाच्या वारकर्याचा सत्कार केला जातो. सोबतच वर्षभर एसटीचा मोफत प्रवास पास दिला जातो.
यंदाचे मानाचे वारकरी कोण?
यंदा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरगाव येथील बाबासाहेब माधव माने (वय ७०) सौ. प्रभावती बाबासाहेब माने (वय ६८) यांनी शासकीय महापूजेमध्ये सहभाग घेतला होता.