Holi 2022 Nail Care Tips: नखांना होळीच्या विषारी रंगांपासून वाचवण्यासाठी 5 सोप्या पद्धती

रंगांचा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळीनंतर, सर्वात कठीण भाग म्हणजे सर्व शरीरातून रंग काढणे .

होळीला आता एक आठवडा बाकी आहे. रंगांचा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळीनंतर, सर्वात कठीण भाग म्हणजे सर्व शरीरातून रंग काढणे . जरी चेहरा आणि शरीरासारख्या भागातून रंग तुलनेने सहज काढले जात असले तरी, नखे आणि कानाच्या आसपासच्या ठिकाणाहून ते काढणे हे एक अवघड कार्य आहे. आनंदाने भरलेली होळी साजरी करत असतांना , LatestLY काही पद्धती घेऊन आले आहेत ज्या तुम्हाला तुमच्या नखांवरचे डाग सहजपणे काढण्यात मदत करतील.

1. लिंबू पाणी

एका भांड्यात काही लिंबू पिळून घ्या आणि पाच ते सात मिनिटे हात बुडवा. यानंतर रंग सहज निघून जाईल.

2. खोबरेल तेल

तुमच्या नखांवरचे रंगांचे डाग काढून टाकण्यासाठी ही सर्वात सामान्य आणि सोपी पद्धत आहे. खोबराच्या तेलात हात भिजवा आणि नखांवर हलक्या हाताने मसाज करा. तेल रंग काढून टाकण्यास मदत करेल.

3. व्हिनेगर

व्हिनेगर विविध प्रकारचे डाग काढून टाकण्यास उपयुक्त आहे. 2-3 चमचे पांढरे व्हिनेगर घ्या आणि काही मिनिटे नखे बुडवा नंतर रंग पूर्णपणे निघेपर्यंत नखे घासून घ्या.

4. सुक्या आंब्याची पावडर

आमचूर पावडर म्हणूनही ओळखली जाते, ती तुमच्या नखांवरून रंगाचे डाग काढून टाकण्यासाठी वापरली जाऊ शकते. अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 2-3 थेंब पाणी घेऊन घट्ट पेस्ट बनवा. रंग निघेपर्यंत घासा रंग निघून जाईल

5. थंड पाण्याचा वापर करा

तुमच्या नखांचे रंग काढण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. कोमट पाणी नखांवर रंग अधिक घट्ट होण्यास मदत करेल आणि यामुळे अधिक नुकसान होते.

नखांमधून रंग काढून टाकण्यासाठी या सोप्या पद्धती वापरायला विसरू नका. सर्वांना होळी २०२२ च्या शुभेच्छा!