Hartalika Tritiya 2020 Messages: हरितालिका तृतीयेनिमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, HD Images, च्या माध्यमातून Facebook, Whatsapp वर शेअर करुन साजरे करा सौभाग्याचे व्रत!

हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप वरुन पाठवून तुम्ही हरितालिकेच्या शुभेच्छा देवू शकता...

Hartalika Tritiya 2020 | File Image

Hartalika Tritiya Marathi Messages: श्रावण महिना सरला की सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. भाद्रपद शुल्क चतुर्थीला श्रीगणरायाचे आगमन घरोघरी होते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते. म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत करतात. इच्छित वरप्राप्ती आणि अखंड सौभाग्यासाठी कुमारिका आणि विवाहित महिला हे व्रत करतात. हरितालिकेदिवशी उमा-शंकराचे पूजन केले जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात. हरितालिकेच्या पूजेसाठी पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मुर्ती आणि शंकराची पिंड यांची पूजा केली जाते. या दिवशी कडक उपवास केला जातो. काही महिला निर्जळी उपवास देखील करतात.

सध्याच्या डिजिटल युगात हरितालिकेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, मेसेजेस, wallpapers, HD Images, ग्रिटिंग्स. हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप वरुन पाठवून तुम्ही हरितालिकेच्या शुभेच्छा देवू शकता.

हरितालिकेच्या शुभेच्छा!

संकल्प शक्तीचे प्रतीक

अखंड सौभाग्याची प्रार्थना

हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना

हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!

Hartalika Tritiya 2020 | File Image

सण सौभाग्याचा

पतीवरील प्रेमाचा

हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Hartalika Tritiya 2020 | File Image

माता उमाला मिळाला जसा शिव वर

तुम्हालाही मिळो मनाजोगता वर

करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर

अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर!

हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!

Hartalika Tritiya 2020 | File Image

तुमच्या सौभाग्याला अक्षय

आनंदासह दिर्घायुष्य लाभो

हरतालिका सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

Hartalika Tritiya 2020 | File Image

हरतालिका व्रत

प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे

हरतालिकेच्या भक्तीमय शुभेच्छा!

Hartalika Tritiya 2020 | File Image

भगवान शंकर पती म्हणून लाभावे यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते, असे मानले जाते. म्हणून इच्छित वरप्राप्तीसाठी कुमारिका् हे व्रत करतात. निर्जळी उपवास करतात. गावात सर्व महिला एकत्र येऊन व्रतानिमित्त पूजा-प्रार्थना करतात. तर शहरात प्रत्येकजण आपल्या घरी  पार्वती आणि तिची सखी यांच्यासह शिवलिंगाची पूजा करुन व्रत केले जाते. दुसऱ्या दिवशी या मुर्त्यांचे विसर्जन करुन व्रताची सांगता करतात.