Happy Ramadan 2020 First Roza Wishes: रमजान करिमच्या पहिल्या उपवासानिमित्त WhatsApp Messages, Ramazan GIF Images, SMS पाठवून साजरा करा आजचा दिवस

तर रमजानचा पहिला चांद गुरुवारी दिसून आला. या दिवसाला रमजान रोझा असे सुद्धा म्हटले जाते. रमजानचा संपूर्ण महिना मुस्लिम बांधव साजरा करत असून या काळात कडक उपवास पकडला जातो. या वेळी फक्त पाणी आणि फळांचे सेवन करुन उपवास करण्यात येतो.

Ramadan 2020 (Photo Credits-File Images)

रमजानच्या महिन्याला आजपासून मुस्लिम बांधवांमध्ये सुरुवात होत आहे. तर रमजानचा पहिला चांद गुरुवारी (23 एप्रिल) दिसून आला. या दिवसाला रमजान रोझा असे सुद्धा म्हटले जाते. रमजानचा संपूर्ण महिना मुस्लिम बांधव साजरा करत असून या काळात कडक उपवास पकडला जातो. या वेळी फक्त पाणी आणि फळांचे सेवन करुन उपवास करण्यात येतो. आजच्या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देतात. मात्र देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता यंदा रमजानचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार नाही आहे. त्यामुले नागरिकांना इफ्तार पार्टीचे आयेजन घरीच करावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत धर्मगुरुंनी सुद्धा रमजानदरम्यान घरातूनच नमाज अदा करण्याचे म्हटले आहे. असे मानले जाते की, रमजानच्या महिन्यात अल्लाह त्यांच्या लोकांसाठी स्वर्गाचे दरवाजे खुले करतो. या महिन्यात मुस्लिम समुदायाचे लोक 20 किंवा 30 दिवस रोजा ठेवतात आणि पाच वेळा नमाज अदा करतात.

भारतात प्रत्येक सण हा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. तसेच प्रत्येक सणाच्या वेळी नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसून येते. खासकरुन जर आता रमजानचा महिना सुरु झाला आहे तर लोक एकमेकांना शुभेच्छा देणे कसे विसरु शकतील? त्यामुळेच रमजान करिमिच्या पहिल्याच उपवासानिमित्त WhatsApp Messages, Ramazan GIF Images, SMS पाठवून साजरा करा आजचा दिवस. (Ramadan Mubarak 2020 Wishes: रमजान महिन्याच्या शुभेच्छा देणारी Greetings, Messages, GIFs, Images शेअर करून मुस्लीम बांधवांचा खास करा Ramadan Kareem चा पहिला दिवस!)

Ramadan 2020 (Photo Credits-File Images)
Ramadan 2020 (Photo Credits-File Images)
Ramadan 2020 (Photo Credits-File Images)
Ramadan 2020 (Photo Credits-File Images)
Ramadan 2020 (Photo Credits-File Images)
Ramadan 2020 (Photo Credits-File Images)

GIF:

 

Ramadan / Ramzan 2020: रमदान महिन्यात 'या' गोष्टी केल्या जातात; म्हणून रमदान महीना पवित्र समजला जातो - Watch Video 

रमजान महिना हा मुस्लिम धर्मियांसाठी स्वयंशिस्त, संयम शिकवणारा आहे. या काळात इतरांना त्रास होईल अशा विनाशी विचार, कृतींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. त्याप्रमाणेच महिनाभर मुस्लिम बांधवांना घालून दिलेल्या नियमांचंही विशेष पालन करायचं असतं. दरवर्षी मुंबईसह देशभरात रमजान महिन्यात स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असते. मात्र यंदा घरच्या घरीच रमजान साजरा करण्याचं, रमजान महिन्यातील नियमित नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.