Hartalika Tritiya 2020 Images: हरितालीका तृतीया निमित्त शुभेच्छा देणयासाठी HD Wallpapers, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status
परंतू, यंदा सर्वच उत्सवांवर कोरोना व्हायरस संकटाचे सावट आहे. त्यामुळे सरकारचे आदेश आणि प्रशासनाच्या सूचना पाळत आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे अंमलबजावणी करत सर्व सण साजरे करावे लागणार आहेत.
महाराष्ट्र आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणपती उत्सव. यंदाचा गणेशत्सव 22 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. दरम्यान, गणेशोत्सवाची सुरुवात जरी श्री गणेश चतुर्थी पासून होत असली तरी त्याचे खरे वेध हरितालीका तृतीया (Happy Hartalika Tritiya 2020) पासूनच लागतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालीका तृतीया (Happy Hartalika Tritiya ) येते. या दिवशी तरुण मुली आणि सुवासिनी व्रत धरतात नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी सोशल मीडिया आणि डिजिटल उपकरणांचा वापर करुन HD Wallpapers, Wishes, Messages, Whatsapp, Facebook Images आदींच्या माध्यमातून अनेक मंडळी एकमेकांना शुभेच्छा देतात. आपल्यालाही अशा काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपणही इथल्या एचडी इमेजेस वापरु शकता.
यंदाच्या वर्षी हरितालीका तृतीया 21 ऑगस्ट 2020 या दिवशी आहे. हरितालीका तृतीया निमित्त महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. अनेक स्त्रिया निर्जला व्रत करतात. शृंगार करून व्रत, पूजा, आरती करतात. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर भारतातही हे वृत केले जाते. प्रदेशानुसार या दिवसाची वेगवेगळी नावे पाहायला मिळतात. जसे की दक्षिण भारतात या दिवसाला गौरी हब्बा म्हणून ओळखले जाते. सांगितले जाते की, विवाहीत स्त्रिया आपल्या जोडीदाराला (पती) दीर्घायुष्य लाभण्यासाठी तर अविवाहित मुली मनासारखा वर मिळण्यासाठी हे व्रत करतात.
हरितालीका शुभेच्छा एचडी इमेज
हरितालीका शुभेच्छा एचडी इमेज
हरितालीका शुभेच्छा एचडी इमेज
हरितालीका शुभेच्छा एचडी इमेज
हरितालीका शुभेच्छा एचडी इमेज
दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सव आणि हरितालीका तृतीया सणाचा आनंद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. परंतू, यंदा सर्वच उत्सवांवर कोरोना व्हायरस संकटाचे सावट आहे. त्यामुळे सरकारचे आदेश आणि प्रशासनाच्या सूचना पाळत आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे अंमलबजावणी करत सर्व सण साजरे करावे लागणार आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव काहीसा कोरोनाच्या सावटाखालीच साजरा करावा लागत आहे.