IPL Auction 2025 Live

Happy Guru Purnima 2020 Messages: गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून माना गुरूंचे आभार!

या निमित्ताने तुमच्या WhatsApp Status, Facebook व सोशल मीडियावरून तुम्ही खास गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Wishes, आवर्जून शेअर करू शकता.

Happy Guru Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

Guru Purnima 2020 Messages in Marathi: यंदा 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पुराणानुसार, आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूंचे गुरु व्यास मुनी यांची जयंती असते, याच निमित्ताने गुरु पौर्णिमा साजरा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा (Vyas Pournima) असेही म्हंटले जाते. दरवर्षी साधारणपणे या काळात शाळा नुकत्याच सुरु झालेल्या असतात. अशावेळी आपल्या गुरूंना भेटून त्यांना वंदन करण्याची संधी मिळते. पण केवळ शाळेत शिकवणारे शिक्षक म्हणेजच गुरु आहेत का? तर नाही, असं म्हणतात आपली आई- बाबा हे आपले सर्वात प्रथम गुरु असतात, मग कुटुंब, मित्र, शेजारी, नातेवाईक आणि एकूणच सर्व समाज आपल्याला शिकवत असतो. इतकंच कशाला ,हवी ती माहिती हवी तेव्हा उपलब्ध करून देणारा गूगल सुद्धा कुठल्या गुरु शिवाय कमी नाही. या सर्वांचे आभार मानता यावेत यासाठी हा दिवस तुम्ही नक्की वापरा. या सेलिब्रेशन मध्ये तुमच्या WhatsApp Status, Facebook व सोशल मीडियावरून तुम्ही खाली दिलेले गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा संंदेश, Wishes, आवर्जून शेअर करू शकता. (हेेही पहा- Guru Purnima 2020 Quotes: गुरुपौर्णिमेनिमित्त संत तुकाराम, कबीर ते साने गुरुजी यांचे अमुल्य विचार शेअर करुन गुरुप्रती व्यक्त करा कृतज्ञता!)

गुरु पौर्णिमा मराठी शुभेच्छा

1) गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु,

गुरुदेवो महेश्वर

गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Guru Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

2) आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वळणावर

काही ना काही शिकवलेल्या ज्ञानात भर पाडलेल्या

सर्व गुरूंना धन्यवाद

गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Happy Guru Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

3) ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड

ज्याला आहे अगाध ज्ञान

जो देई हे निस्वार्थ दान

गुरु त्यासी मानावा

देव तेथेची जाणावा

गुरुपौर्णिमेच्या खूप खुप शुभेच्छा!

Happy Guru Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

4) गुरु म्हणजे आहे काशी

साती तीर्थ तया पाशी

तुका म्हणा ऐंसे गुरु

चरण त्याचे हृदयी धरू

गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!

Happy Guru Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

5) जे जे आपणासी ठावे,

ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करून सोडी सकळ जना

तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Happy Guru Purnima 2020 Marathi Messages (Photo Credits: File Image)

अनेकदा कोण्या अन्य व्यक्तीच्या आधीच आपणही स्वतहा आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतो, त्यामुळे तुमच्यातील गुरूला सुद्धा आवर्जून वंदन करा. तुम्हा सर्वाना येत्या गुरु पौर्णिमा सणाच्या खूप खूप शुभेच्छा!