Happy Ganesh Chaturthi Messages In Marathi: गणेश चतुर्थी निमित्त WhatsApp Status, Quotes, Images द्वारे शुभेच्छा देऊन करा गणरायाचं स्वागत!
त्यामुळे तुम्ही देखील WhatsApp Status, Quotes, Images द्वारे आपल्या जवळच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीने तयार केलेल्या ईमेजेस डाऊनलोड करू शकता.
Happy Ganesh Chaturthi Messages In Marathi: गणेश चतुर्थीलाच (Ganesh Chaturthi 2024) गणेश जयंती (Ganesh Jayanti 2024) असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी गणेश चतुर्थी किंवा गणेश जयंती भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. 10 दिवसांचा गणेश उत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथीला संपतो.
गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतात आणि त्याची पूजा करतात. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला आहे. त्यामुळे या दिवशी गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली जाईल. या दिवशी देशभरातील गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक एकमेकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे तुम्ही देखील WhatsApp Status, Quotes, Images द्वारे आपल्या जवळच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवू शकता. यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीने तयार केलेल्या ईमेजेस डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा -Lalbaugcha Raja First Look HD Images: मुंबईच्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आला समोर; WhatsApp Status, Facebook Message द्वारे करा शेअर, See Pic)
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
आणि भरभराट होवो हीच सदिच्छा!
मंगलमूर्ती मोरया!!!
सुखकर्ता, वरदविनायक,
गणरायाच्या आगमनाने होतो प्रसन्न सारा आसमंत
अशा या बाप्पाच्या आगमनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणरायाच्या सर्व प्रिय भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा!
पंचांगानुसार, गणेश चतुर्थीच्या योग्य तिथीसाठी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सूर्योदयाच्या वेळी असणे आवश्यक आहे. गणेश चतुर्थी सूर्योदयाच्या वेळी चतुर्थी येते त्या तारखेला साजरी केली जाईल. या आधारावर पाहिल्यास, या वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 03:01 ते 7 सप्टेंबर रोजी 05:37 पर्यंत असेल.