Happy Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Facebook Messages द्वारा देत साजरा करा सोहळा आनंदाचा
यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या जवळच्या व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देऊन हा सण अधिक आनंदाने साजरा करूया. मग त्यासाठी या मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp, Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
Ganesh Chaturthi 2026 Wishes In Marathi: गणपती बाप्पा हे बुद्धी, विवेक आणि यशाचे प्रतीक मानले जातात. कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात करताना प्रथम गणेशाचे स्मरण केले जाते, कारण तो सर्व विघ्नांचा नाश करणारा देव आहे. गणेश चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करण्याची रीत आहे. पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची पूजा करणे. मातीची मूर्ती नैसर्गिक असते आणि विसर्जनानंतर ती पुन्हा निसर्गात विलीन होते. मग अशा या मंगलमय गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी घरी बाप्पाचं आगमन करताना तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देत WhatsApp Status, Facebook Messages, Instagram Post शेअर करत या सणाचा आनंद द्विगुणित करा.
गणेश चतुर्थी यंदा 14 सप्टेंबरला आहे. या दिवशी घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. पुढे रीतीनुसार किमान दीड ते दहा दिवस बाप्पाची नियमित पूजा केली जाणार आहे. यंदा सार्वजनिक गणपती बारा दिवस साजरा केला जाणार आहे. नक्की वाचा: Ganesh Utsav 2026: कोकणात गणेशोत्सवात दिसणारी 'माटी' म्हणजे काय? कोणकोणत्या गोष्टी बांधतात घ्या जाणून.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा



गणेश चतुर्थी हा सण केवळ धार्मिक उत्सव नसून तो एकत्रितपणा, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.गणेश चतुर्थी हा सण आनंद, श्रद्धा आणि एकत्रितपणाचा संदेश देतो. योग्य शब्दांत दिलेल्या शुभेच्छा नात्यांमधील ओलावा वाढवतात आणि सणाचा आनंद द्विगुणित करतात. यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या जवळच्या व्यक्तींना मनापासून शुभेच्छा देऊन हा सण अधिक आनंदाने साजरा करूया.
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2026 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

