Happy Dussehra 2020 Images: विजयादशमी, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हटके HD Greetings, Wallpapers, Wishes; शेअर करा सणाचा आनंद
पूर्वंपार चालत आलेली 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' मोठा नाही आनंदाला तोटा ही म्हणच बरेच काही सांगून जाते. या दिवशी सोने, वाहन, घर खरेदी प्राधान्य दिले जाते. लहान थोर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात.
Happy Dasara Wishes in Marathi: हिंदू पंचांगानुसार आश्विन शुद्ध दशमीला येणारा सण म्हणजे विजयादशमी (Vijayadashami 2020). विजयादशमी (Vijayadashami ) म्हणजेच दसरा (Dussehra). या सणाला हिंदू संस्कृतीत प्रचंड मान आणि महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. पूर्वंपार चालत आलेली 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' मोठा नाही आनंदाला तोटा ही म्हणच बरेच काही सांगून जाते. या दिवशी सोने, वाहन, घर खरेदी प्राधान्य दिले जाते. लहान थोर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. आपणासही विजयादषमी म्हणजेच दसरा सणानिमीत्त आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यासाठी HD Greetings, Wallpapers, Wishes आपल्याला इथे मिळू शकतील. यांच्या माध्यमातून आपण दसरा सणाचा आनंद अधिक द्विगुणीत करु शकता.
दसरा सणानिमित्त सरस्वती पूजन केले जाते. एकमेकांना शुभेच्छा देत सीमोलंघनही साजरे केले जाते. सांगितले जाते की, याच दिवशी देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. तेव्हापासून या देवीला महिषासून मर्दीनी असे म्हणले जाऊ लागले. आणखीही एक दाखला पुरानात दिला जातो. ती म्हणजे पांडव जेव्हा अज्ञातवासात गेले तेव्हा त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. अज्ञातवासातून परत आल्यानंतर त्यांनी आपली शस्त्रे खाली उतरवली आणि त्यांची पूजा केली. (हेही वाचा, Good Luck things for Dussehra : दसऱ्याला 'या' गोष्टी मानल्या जातात शुभ)
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनीही प्रतापगडावर याच दिवशी भवानी देवी उत्सवाला सुरुवात केली. पेशवाईच्या काळातही या सणाचे महत्त्व कायम राहिले. विजया दशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा एक दिवस असेही मानले जाते.