Guru Purnima 2019: गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? काय आहे त्यामागील महत्त्व?
व्यक्ती, पुस्तक, देव, निसर्ग आदी. समुद्रातून तुम्हाला पाणी घ्यायचे असेल तर आधी त्यापुढे झुकावे लागते. त्याचप्रमाणे गुरुकडून ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठई तुम्हाला गुरुंपुढे नम्र व्हावे लागेल.
Significance and Importance of Guru Purnima 2019: ज्ञानाशिवाय आयुष्यात आपण प्रगतीपथाकडे वाटचाल करु शकत नाही आणि ज्ञान मिळवण्याचा मार्ग म्हणजे गुरु. गुरु म्हणजे ज्ञानाचा समुद्र. मग तुम्ही गुरु कोणालाही माना. व्यक्ती, पुस्तक, देव, निसर्ग आदी. समुद्रातून तुम्हाला पाणी घ्यायचे असेल तर आधी त्यापुढे झुकावे लागते. त्याचप्रमाणे गुरुकडून ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी तुम्हाला गुरुंपुढे नम्र व्हावे लागेल. आपल्या संस्कृतीत आईला प्रथम गुरु मानले जाते. कारण लहानपणापासूनच ती आपल्याला विविध माहिती, ज्ञान, संस्कार देत असते.
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. यंदा 16 जुलै, मंगळवारी गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाईल. या दिवशी विद्याभ्यास, संगीत, नृत्य, इतर कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंपुढे नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि गुरुंना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे.
व्यास हे पराशर ऋषी आणि कोळी राजाची मुलगी सत्यवती यांचे पुत्र होते. पराशर हे अतिशय विद्वान होते. त्यामुळे त्यांनी व्यास यांनाही शिकवून विद्वान केले. सोळा वर्षांचे असताना व्यासांना वेदांचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. पूर्वी ज्ञान तोंडी सांगण्याची पद्धत होती. मात्र त्यामुळे थोडा विस्कळीतपणा येत होता. तो टाळण्यासाठी व्यासांनी वेदांची नीट रचना कली आणि आपल्या समोर आले चार वेद- ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद. या त्यांच्या कार्यामुळे त्यांना 'वेदव्यास' असेही म्हणतात. तसंच व्यासमुनी उच्चासनावर बसून वेदांचे अर्थ सांगत त्यामुळे आजही सभेत वक्ता बोलतो त्या जागेला 'व्यासपीठ' असे म्हणतात.
म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ज्ञान देणाऱ्या व्यासमुनींना देखील नमस्कार करतात. आई ही तर प्रथम गुरु. त्यानंतर वेळोवेळी योग्य ती शिकवण देणारे वडील हे देखील आपले गुरु. मग आयुष्यात विविध टप्प्यांवर गुरुंची गाठ पडत जाते. त्याचबरोबर ग्रंथरुपी गुरु तर सर्वांना सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे या सर्वांना वंदन करुन त्यांच्या प्रती कृतज्ञना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.