Guru Purnima 2019: आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण
आजच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुंचे स्मरण करतात तसेच, त्यांनी दिलेल्या शिवणीची परतफेड म्हणून त्यांना वंदनही करता. काही शिष्य त्यांना भेट वैगेरे देतात. याला काही लोक गुरु दक्षिणा असेही म्हणतात. तर गुरुपौर्णिमेनिमत्त जाणून घेऊया आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण.
Important Qualities For The Ideal Guru: हिंदू पंचांग आणि संस्कृतीत आमवस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असते. त्यामुळे आषाढ शुद्ध पौर्णिमा ही सुद्धा एका वेगळ्या अर्थाने महत्त्वाची ठरते. आषाढ शुद्ध पौर्णिमा ही 'गुरुपौर्णिमा' (Guru Purnima 2019) म्हणून साजरी केली जाते. यंदा ही पौर्णिमा आज म्हणजेच 16 जुलै 2019 रोजी साजरी होत आहे. गुरुपौर्णिमा या नावातच ध्यानात येते की, आजचा दिवस हा गुरुशिष्य परंपरेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुंचे स्मरण करतात तसेच, त्यांनी दिलेल्या शिवणीची परतफेड म्हणून त्यांना वंदनही करता. काही शिष्य त्यांना भेट वैगेरे देतात. याला काही लोक गुरु दक्षिणा असेही म्हणतात. तर गुरुपौर्णिमेनिमत्त जाणून घेऊया आदर्श गुरुमध्ये आढळणारे पाच महत्त्वाचे गुण.
ज्ञान आणि शिष्याप्रति निष्ठा
आदर्श गुरु हा निष्ठावान असतो. तो ज्ञान आणि उपासनेत सातत्याने दक्ष राहतो. आपले ज्ञान सातत्याने वाढवत नेत तो शिष्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो. त्यामुळे आदर्श गुरुमध्ये ज्ञान आणि शिष्य यांच्या प्रति निष्ठा ही आढळतेच.
तटस्थता
तटस्थता हाही आदर्श गुरुत दिसणारा एक महत्त्वाचा गुण. आदर्श गुरु हो कधीही भावनिक होत नाही. झालाच तर, आपल्या भावनांवर त्याला नियंत्रण ठेवता येते. भावनांवर नियंत्रण मिळवणारा गुरु हा कोणा एकाच विद्यार्थी किंवा समूहाच्या प्रेमात पडत नाही. त्याला सर्व शिष्य हे सारखेच असतात. त्यामुळे प्रत्येक्ष शिष्य आणि समुहाकडे तो तटस्थरित्याच पाहतो. तो कोणत्याही शिष्याला कमी लेखत नाही.
निस्वार्थीपणा
आदर्श गुरुमध्ये निस्वार्थीपणा हा गुण कमालाची महत्त्वाचा असतो. आदर्श गुरु हा शिष्याला दिलेल्या ज्ञानाच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची आपेक्षा ठेवत नाही. तसेच, ज्ञानदानाबद्दल शिष्याकडून आलेली कोणत्याही प्रकारची भेट तो कमी लेखत नाही. ती भेट तो मोठ्या मनाने स्वीकारतो. त्याच्या मनात कोणताही स्वार्थी हेतू नसतो. (हेही वाचा, Guru Purnima 2019: आदर्श गुरु शिष्यांच्या या 5 जोड्या आहेत जगात भारी)
निंदा, मस्करी, गर्वा यांपासून दूर
अनेकदा उच्च पदावार पोहोचलेल्या व्यक्तीला गर्व होण्याची शक्यता असते. उच्चपदी पोहोचल्याच्या गर्वातून तो अनेकदा निंदा, मस्करी, आदी गोष्टी करु लागतो. पण, आदर्श गुरुमध्ये या गोष्टी दिसत नाहीत.
प्रसिद्धीपराड्.मुख आयुष्य
आपली स्तुती, प्रसिद्धी, लोकप्रियता ही अनेकांना हवीहवीशी वाटणारी बाब आहे. आपली स्तुती, प्रसिद्धी व्हावी लोकप्रियता वाढावी यासाठी लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतानाही आढळतात. परंतू खरा गुरु हा अशी स्तुथी, प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या हव्यासापासून दूर राहणेच पसंत करतो. प्रसिद्धीपराड्.मुख आयुष्य हे खऱ्या गुरुची ओळख असते. प्रसिद्धीपराड्.मुखताच त्यांच्या लोकप्रियतेचे वैशिष्ट्य ठरते हेही विशेष.
आदर्श गुरुमध्ये वरील सर्व गुण हे दिसतातच. परंतु, कधी कधी अनेक गुरुंमध्ये या गुणाचा अभाव आढळतो. याचा अर्थ असे लोक हे गुरु नसतात काय? तर, तसे नाही. ते लोकही गुरु असतातच. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्तीही. ही बाब सर्वच ठिकाणी लागू होते. अगदी गुरु शिष्य परंपरेतही. त्यामुळे वरील गुण हे आदर्श गुरुमध्ये आढळतातच. अर्थातय यांशिवाय इतरही अनेक गुण हे आदर्श गुरुमध्ये आढळतात. वरील मुद्दे हे प्रातिनिधीक आहेत.