IPL Auction 2025 Live

Guru Purnima Gift Ideas: यंदाची गुरूपौर्णिमा खास करतील अशा गुरूंसाठी '5' बजेट फ्रेंडली गिफ्ट आयडियाज

म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा 5 सुंदर भेटवस्तू सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या गुरूंना देण्याचा विचार करु शकता.

Gifts For Our Teacher (Photo Credits: Instagram)

भारतीय संस्कृतीत आपल्या आईवडिलांनंतर ज्यांना आपल्या आयुष्यात विशेष असे महत्त्व आहे अशा आपल्या गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणजे 'गुरुपौर्णिमा' (Guru Purnima). गुरुपौर्णिमा हा दिवस म्हणजे गुरुपूजनाचा दिवस. ज्या गुरुंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो, अशा गुरुंना अभिवादन करण्याचा दिवस, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच 'गुरुपौर्णिमा.' व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला 'व्यासपौर्णिमा' असेही म्हणतात. या दिवशी विद्याभ्यास, संगीत, नृत्य, इतर कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंपुढे नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि गुरुंना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. ही दक्षिणा म्हणून आपण त्यांना या दिवशी आठवणीत राहील अशी छान भेटवस्तू त्यांना देऊ शकतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा 5 सुंदर भेटवस्तू सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या गुरूंना देण्याचा विचार करु शकता.

1. पुष्पगुच्छ अथवा गुलाबाचे फूल

फूल हे नेहमी प्रेमाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे आपल्या गुरुंविषयी वाटणारे प्रेम, आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर आपण आपल्या गुरुंना गुलाबाचे फूल किंव सुंदर अशा फुलांचा गुच्छ भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

2. पुस्तक

आपल्याला ज्ञान देणा-या गुरुंना त्यांच्या आवडत्या लेखकाचे किंवा त्यांच्या आवडत्या विषयाचे पुस्तक भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

3. डायरी

काही लोकांना नित्य नियमाने डायरी लिहिण्याची सवय असते. आपण दिवस भरात काय केले हे त्या डायरीत लिहिण्याची सवय असते. म्हणूनच आपल्या गुरुंना भेटवस्तू एक छान डायरी देता येईल.

4. पेन

आपल्या शिक्षकांना लिखाण करण्याची आवड असते. अशावेळी आपण छान पेन भेटवस्तू म्हणून आपल्या गुरुंना देऊ शकतो.

5. स्मार्ट बँड

सध्या सारी दुनिया गॅजेट्सवर चालणारी झाली आहे. म्हणूनच आपल्या गुरुंच्या शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने आपण त्यांना एखादे स्मार्ट बँड गिफ्ट म्हणून देऊ शकता. आज काल ऑनलाईन शॉपिंग साइट आणि बाजारात खूप चांगले स्मार्टबँड मिळतात.

हेही वाचा- 15 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरु होतोय धमाकेदार सेल, पाहा कोणत्या आहेत आकर्षक ऑफर्स

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गॅजेट्स भेटवस्तू म्हणून आपल्या गुरुंना द्यायची असेल तर 15 जुलै पासून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या शॉपिंग साइटवर बिग शॉपिंग डेज सेल सुरु होत आहे. या सेलमध्ये तुम्हाला एकाहून एक सरस गॅजेट्स तसेच अन्य वस्तू खरेदी करता येऊ शकतात.

आम्ही सांगितलेल्या भेटवस्तू आपल्या गुरुंना देऊन 16 जुलै ला येणारी गुरुपौर्णिमा तुम्ही खास करु शकता. शेवटी आपण आपल्या गुरुंना काहीही भेटवस्तू दिली तरी खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्षात आचरणात आणणे ही आहे.