Guru Purnima 2026 Date: यंदा गुरुपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या तिथी, महत्त्व
गुरुपौर्णिमा यंदा 29 जुलै, 2026 रोजी साजरा केली जाईल. पौर्णिमेची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6:18 वाजता होईल आणि 29 जुलै रोजी रात्री 8:04 वाजता संपेल.
आषाढ पौर्णिमेचा (Ashadha Purnima) दिवस हा गुरूपौर्णिमा (Guru Purnima) म्हणून साजरा केला जातो. ज्ञान, श्रद्धा आणि आदराचा पवित्र सण म्हणून हा दइवस पाळला जातो. भारतीय संस्कृतीतील गुरू शिष्य परंपरेला वारसा जपत गुरूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 29 जुलै दिवशी व्यासपौर्णिमा (Vyas Purnima) अर्थात गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. महाभारत रचणारे महर्षी वेद व्यास यांच्या जन्मोत्सव म्हणून देखील व्यासपौर्णिमा साजरी केली जाते. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जातात.
गुरुपूजन म्हणजे काय?
गुरूपूजन हे आपल्या आयुष्यात गुरूची भूमिका साकारात योग्य मार्गावर चालण्याची, दिशा दाखवणार्या व्यक्तीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे आहे. त्यांनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन. गुरू-अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात त्यामुळे त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. Guru Purnima Gift Ideas: यंदाची गुरूपौर्णिमा खास करतील अशा गुरूंसाठी '5' बजेट फ्रेंडली गिफ्ट आयडियाज.
गुरूपौर्णिमा कधी आहे? तिथी आणि वेळ
गुरुपौर्णिमा यंदा 29 जुलै, 2026 रोजी साजरा केली जाईल. पौर्णिमेची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6:18 वाजता होईल आणि 29 जुलै रोजी रात्री 8:04 वाजता संपेल.
गुरूपौर्णिमा कशी साजरी केली जाते?
गुरूपौर्णिमा हा सण गुरूंप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. भारतामध्ये कलाक्षेत्र प्रामुख्याने शास्त्रीय संगीत, नृत्य कलाक्षेत्रामध्ये शिष्य आपल्या कलेमधून गुरूंना आदरांजली व्यक्त करतात. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात एखादी व्यक्ती किंवा सदगुरू म्हणून असते त्यांचे दर्शन घेतले जाते. तर अनेकजण गुरूमंदिरामध्येही जाऊन देवाचे दर्शन घेऊन त्यांचे आभार मानतात. या निमित्ताने अनेक मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई,सजावट केली जाते.