Gudi Padwa 2024 Rangoli Designs: गुढीपाडव्याला काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
गुढीपाडव्याला आपली घरे स्वच्छ करतात आणि घरासमोर रांगोळी काढतात. गुढीपाडव्याला तुम्ही रांगोळीच्या सुंदर डिझाईन्स काढू शकता, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत रांगोळीच्या आकर्षक डिझाइन्स, पाहा व्हिडीओ
Gudi Padwa 2024 Rangoli Designs: गुढीपाडवा हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते, या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवसाशी संबंधित पौराणिक मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि या दिवसापासून सत्ययुग सुरू झाला. गुढी म्हणजे विजयाची पताका आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी, म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदेला लोक विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी सजवतात. या दिवशी गुढी उभारल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे म्हणतात. राज्यात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात, कारण मराठी लोकांसाठी हा नववर्षाचा सण मानला जातो. गुढीपाडव्याला आपली घरे स्वच्छ करतात आणि घरासमोर रांगोळी काढतात. गुढीपाडव्याला तुम्ही रांगोळीच्या सुंदर डिझाईन्स काढू शकता, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत रांगोळीच्या आकर्षक डिझाइन्स…
गुढीपाडव्याला काढता येतील अशा खास रांगोळी डिझाईन
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गुढीपाडव्याला गुढी सजवण्याबरोबरच लोक आपल्या घराच्या गेटवर आंब्याचा किंवा अशोकाच्या पानांनी सजवतात. या सणात पुरणपोळी बनवून हा सण साजरा केला जातो. खरे तर पुरणपोळी हा महाराष्ट्राचा खास पदार्थ मानला जातो.
(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2024 11:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

