Ram Navami 2023 HD Images: श्रीराम नवमी निमित्त Wishes, Messages, Greetings, SMS द्वारे रामभक्तांना द्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!
श्रीराम नवमी निमित्त Wishes, Messages, Greetings, SMS द्वारे आपल्या मित्र-परिवारास खास मराळमोळ्या शुभेच्छा पाठवून तुम्ही त्यांचा दिवस खास करू शकता.
Ram Navami 2023 HD Images: गुरुवार, 30 मार्च रोजी रामनवमीचा सण साजरा होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला झाला. भगवान रामाची जयंती म्हणून देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राम नवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवमी तारखेला भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामनवमीला रामायण आणि रामरक्षा स्तोत्राचा पाठ वाचला जातो. या दिवशी सर्व मंदिरे विशेष सजवली जातात आणि भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते.
धार्मिक मान्यतांनुसार, भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला दुपारी झाला. दुपारचा अभिजीत मुहूर्त हा मुहूर्त शास्त्रात सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. भगवान श्रीरामांचा जन्म कर्क राशीत, अभिजीत मुहूर्तात, सूर्य, बुध, गुरु, शुक्र आणि शनि विशेष योगात झाला. चैत्र नवरात्रीच्या शेवटी असलेल्या तारखेला रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीराम नवमी निमित्त Wishes, Messages, Greetings, SMS द्वारे आपल्या मित्र-परिवारास खास मराळमोळ्या शुभेच्छा पाठवून तुम्ही त्यांचा दिवस खास करू शकता.
छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास व आपल्या संपुर्ण परीवारास
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना
खूप खूप शुभेच्छा!
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असो.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
श्री राम नवमी शुभेच्छा
प्रभु श्री रामचंद्र की जय
सर्वांना श्री रामनवमीच्या खुप खुप शुभेच्छा
जय श्रीराम जय बजरंगबली
श्री प्रभू रामचंद्र आपणांस
आरोग्य, सुख, शांती
भरभरून प्रदान करो.
ही श्रीराम चरणी प्रार्थना
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जय श्रीराम!
यावेळी रामनवमीला ग्रह आणि नक्षत्रांचा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ संयोग होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार यावेळी रामनवमीच्या सणावर 5 दुर्मिळ योगायोग एकत्र घडत आहेत. रामनवमीला अमृत सिद्धी योग, गुरु पुष्य योग, शुभ योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग तयार होत आहेत. याशिवाय गुरुवारी रामनवमी आल्याने त्याचे महत्त्व खूप वाढले आहे.