Maharashtra Farmers Day 2023 Messages: शेतकरी दिनानिमित्त WhatsApp Status, Quotes, SMS, Wishes शेअर करत बळीराजाला द्या खास शुभेच्छा!
यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
Maharashtra Farmers Day 2023 Messages: पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ 30 ऑगस्ट हा महाराष्ट्र शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा गौरव व्हावा यासाठी त्यांचा जन्मदिवस 30 ऑगस्ट 2023 रोजी नारळी पौर्णिमेच्या दिवशी शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठे नाव होते. त्यांच्याकडे सहकारातील तज्ज्ञ म्हणून पाहिले जात होते. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील हे साखर कारखान्याचे प्रणेते होते. शेतकरी दिनानिमित्त खालील WhatsApp Status, Quotes, SMS, Wishes शेअर करून तुम्ही देशातील तमाम शेतकरी बांधवांना खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल,
त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल
शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
स्वतःचं घर गळत असूनही पावसाची अपेक्षा करत असतो तो फक्त शेतकरी
शेतकरी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा,
मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा,
शेतात राबतो आपला सर्जा राजा.
शेतकरी दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत
आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय
त्याची दुःखे कळत नाहीत!
शेतकरी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा!
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, रात्रभर झोप लागणार नाही,
विचार करा… शेतकऱ्याचं काय होत असेल.
सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
ब्रिटीश सरकारने आणलेल्या तुकड्या बंदी आणि तुकडा जोड कायद्यामुळे सावकारांच्या घशात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. विखे पाटल यांना सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल केंद्र सरकारने १९६१ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले होते.