Narali Purnima Quotes In Marathi: नारळी पौर्णिमा निमित्त Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!

नारळी पौर्णिमा निमित्त तुम्ही कोळी बांधवाना नारळी पौर्णिमा कोट्स, नारळी पौर्णिमा संदेश, नारळी पौर्णिमा मराठी संदेश, नारळी पौर्णिमा मेसेज, नारळी पौर्णिमा प्रतिमा, नारळी पौर्णिमा व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारे खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.

Narali Purnima Quotes (Photo Credit - File Image)

Narali Purnima Quotes In Marathi: नारळी पौर्णिमेचा (Narali Purnima 2024) सण समुद्र देव वरुणला समर्पित आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. द्रीक पंचांग नुसार नारळी पौर्णिमा 19 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेचं आज साजरी केली जात आहे. नारळी पौर्णिमेला कोकण आणि महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. मच्छीमार समाजातील लोक हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ते या दिवशी समुद्राची देवता वरुण देवाची प्रार्थना करतात.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केला जातो. जे लोक पश्चिम घाटाच्या जवळ राहतात, जिथे समुद्र हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा एकमेव स्त्रोत आहे, ते नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. नारळी पौर्णिमा निमित्त तुम्ही कोळी बांधवाना नारळी पौर्णिमा कोट्स, नारळी पौर्णिमा संदेश, नारळी पौर्णिमा मराठी संदेश, नारळी पौर्णिमा मेसेज, नारळी पौर्णिमा प्रतिमा, नारळी पौर्णिमा व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारे खास मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. (हेही वाचा - Narali Purnima 2024 HD Images: नारळी पौर्णिमा निमित्त Wishes, Whatsapp Status, Greetings च्या माध्यमातून द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!)

नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव भगवान वरुण देवाकडे समुद्रात प्रवास करताना तसेच मासेमारी करताना उद्भवणाऱ्या प्रतिकूल घटनांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करतात. या दिवसापासून मासेमारीचा हंगाम सुरू होतो. या शुभ दिवशी कोळी बांधव नृत्य आणि गायन करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.