Gauri Pujan 2023 Images in Marathi: ज्येष्ठा गौरी आवाहनानिमित्त खास Wishes, Messages, Greetings शेअर करून साजरा करा गौरी पूजनाचा मंगलमय सण

त्यामुळे वाजतगाजत, दारात रांगोळी काढून तिचे स्वागत केले जाते. संपूर्ण घरात लक्ष्मीची पावले काढून तिला घरातील सर्व जागा दाखविल्या जातात. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना केली जाते.

Gauri Pujan 2023 Images (File Image)

Jyeshtha Gauri Pujan 2023 Images: नुकतेच 19 सप्टेंबरला घरोघरी गणरायाचे आगमन झाले व त्यानंतर वेध लागले होते ते गौराईचे. आता उद्या म्हणजेच 21 सप्टेंबर, गुरुवारी जेष्ठा गौरी आवाहन (Jyeshtha Gauri Pujan 2023) आहे. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौराईची पूजा करून तिला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन होते.

हिंदू धर्मात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया गौरीची पूजा करतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या रितीरिवाजाप्रमाणे गौरी बसविल्या जातात. काही ठिकाणी उभ्या गौरी असतात, तर काही ठिकाणी खड्यांची पूजा केली जाते. अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी, समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो.

तर या मंगलमय प्रसंगी तुम्ही खास Wishes, Images, Messages, WhatsApp Status, Greetings च्या माध्यमातून ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Gauri Pujan 2023 Images
Gauri Pujan 2023 Images
Gauri Pujan 2023 Images
Gauri Pujan 2023 Images
Gauri Pujan 2023 Images

दरम्यान, पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाने त्रस्त झालेल्या पृथ्वीवरील महिलांनी त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध केला. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2023 Live Streaming: आता घरबसल्या घ्या लालबागच्या राजाचे दर्शन; या' ठिकाणी पहा गणेशोत्सवाचे लाईव्ह स्ट्रिमिंग)

गौरी ही माहेरवाशीण म्हणून घरी येते. त्यामुळे वाजतगाजत, दारात रांगोळी काढून तिचे स्वागत केले जाते. संपूर्ण घरात लक्ष्मीची पावले काढून तिला घरातील सर्व जागा दाखविल्या जातात. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना केली जाते. नंतर मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात. पहिल्या दिवशी गौरीला भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळी व तिसऱ्या दिवशी गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवून तिचे विसर्जन होते.

Tags

Gauri Puja Status Gauri Puja wishes Gauri Puja wishes in Marathi Gauri Pujan Gauri Pujan 2023 Greetings Gauri Pujan 2023 Images Gauri Pujan 2023 Images in Marathi Gauri Pujan 2023 Messages Gauri Pujan 2023 Wishes Gauri Pujan Messages Gauri Pujan Wishes Jyeshta Gauri Pujan Wishes Jyeshtha Gauri Jyeshtha Gauri Avahana 2023 Jyeshtha Gauri Avahana Date Jyeshtha Gauri Puja Jyeshtha Gauri Puja date Jyeshtha Gauri Puja greetings Jyeshtha Gauri Puja images Jyeshtha Gauri Puja messages Jyeshtha Gauri Puja wishes Jyeshtha Gauri Pujan Marathi messages Jyeshtha Gauri Pujan Marathi wishes Jyeshtha Gauri Pujan messages Jyeshtha Gauri Pujan wishes Jyestha Gauri Puja Jyestha Gauri Puja 2023 Jyestha Gauri Pujan गौरी आवाहन गौरी आवाहन 2023 गौरी आवाहन मराठी शुभेच्छा गौरी आवाहन मराठी संदेश गौरी आवाहन शुभेच्छा गौरी पूजन गौरी पूजन इमेजेस गौरी पूजन मराठी शुभेच्छा गौरी पूजन मेसेजेस गौरी पूजन व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस गौरी पूजनाच्या शुभेच्छा गौरी पूजा स्टेटस ज्येष्ठा गौरी आवाहन ज्येष्ठा गौरी पूजन ज्येष्ठा गौरी पूजन 2023 ज्येष्ठा गौरी पूजनाच्या शुभेच्छा मंगलमय सण सण आणि उत्सव


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif