Gauri-Ganpati Visarjan Messages In Marathi: गौरी-गणपती विसर्जनाला बाप्पाला निरोप देताना प्रियजणांसोबत शेअर करा मराठमोळी Greetings, Quotes, Slogans!
त्यामुळे हा निरोपाचा क्षण अनेक भक्तांना भावूक करणारा आहे.
Gauri-Ganesh Visarjan Messages In Marathi: गणेशभक्तांच्या घरी सात दिवसांच्या वास्तव्यानंतर गौरींसोबत गणपती बाप्पाचं देखील विसर्जन होणार आहे. आज 12 सप्टेंबरला गौरी-गणपतींचं विसर्जन (Gauri Ganpati Visarjan) होणार आहे. मनोभावे पूजा केल्यानंतर गणेशभक्त सातव्या दिवशी मोठ्या जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतात. जितकी धामधूम बाप्पाच्या आगमनाला असते तितक्याच धूमधडाक्यात आणि जंगी मिरवणूकीमध्ये बाप्पाला निरोप दिला जातो. मग या गौरी-गणपतीच्या विसर्जनाला बाप्पाला निरोप देण्यासाठी खास शुभेच्छापत्र, Wishes, Quotes, Facebook Messages, WhatsApp Status शेअर करत या दिवसाचा आनंद तुम्ही शेअर करू शकता.
घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन 5 किंवा 7 व्या दिवशी होते. गौरी विराजमान झालेल्या घरातही गणपती बाप्पांचं विसर्जन सातव्या दिवशी किंवा गौरींसोबतच केले जाते. नक्की वाचा: Ganesh Visarjan 2024 Wishes In Marathi: पाच दिवसीय गणपती विसर्जनानिमित्त Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून द्या लाडक्या बाप्पाला निरोप!
गौरी गणपती विसर्जन मेसेजेस
गौराई या माता पार्वतीच्या रूपात येऊन बाल गणेशाला पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी येतात अशी धारणा आहे. त्यामुळे हा निरोपाचा क्षण अनेक भक्तांना भावूक करणारा आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती गौरी-गणपतीच्या विसर्जनापूर्वी मंत्रोच्चाराने बाप्पाच्या मूर्ती मध्ये केलेली प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातील देवत्त्व काढून घेतात. निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते. शाडूची माती किंवा पर्यावरणपूरक वस्तूंनी घडवलेल्या गणेशमूर्तींचं देखील घरातच विसर्जन केले जाऊ शकतं.