Gauri Avahan 2023 Wishes in Marathi: गौरी आवाहनाच्या शुभेच्छा, Messages, Wishes, Greetings शेअर करत साजरा करा गौराईच्या आगमनाचा सोहळा

२१ सप्टेंबरला गौरी आवाहनादिवशी दुपारी3.34 वाजेपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत लाडक्या गौराईचे आपल्या घरी आगमन होणार आहे.

Gauri Pujan 2023 Images

घरगुती गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या आगमनापाठोपाठ 21 सप्टेंबर दिवशी गौराईंचं आगमन (Gauri Avahan) होणार आहे. गौराईच्या रूपात माता पार्वतीचं घरात आगमन होतं. राज्यात विविध भागांमध्ये गौराई आणण्याची ती स्थापन करण्याची रीत वेगवेगळी आहे. यंदा 21 सप्टेंबरला गौराईचं आगमन होईल, त्यानंतर तिचं पूजन होईल आणि तिसर्‍या दिवशी विसर्जन होणार आहे. गौराईचा सण महिलावर्गासाठी आणि त्यातही माहेरवाशिणींसाठी खास असतो. मग या सणाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मैत्रिणींना देऊन हा दिवस खास करायला विसरू नका. त्यासाठी WhatsApp Messages, Wishes, Images, Greetings, Photos शेअर करत या गौरी आवाहनाचा दिवस अजून खास करा.

गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रामध्ये होते. याच दिवशी रात्री तिचा साजशृंगार केला जातो. तर दुसर्‍या दिवशी तिची विधीवत पूजा केली जाते. सवाष्ण महिला ओवसं घेऊन तिची पूजा करण्याची कोकणात प्रथा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात गौराईचं पूजन खास आणि पारंपारिक अंदाजात केलं जातं. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. ज्येष्ठा गौरीना पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात.  नक्की वाचा: Ganpati Special Songs 2023: गणपतीची गाणी, गणेश भक्तांसाठी खास 'Amchya Pappani Ganpati Anala' .

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

Gauri Aavahan Wishes in Marathi | File Image

आली आली गौराई

सोन पावलांच्या रूपाने

आली आली गौराई

धनधान्यांच्या रूपाने

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा !

-----------------

Gauri Aavahan Wishes in Marathi | File Image

गौराई माते नमन तुला मी करते

अखंड सौभाग्य लाभू दे मला

हेच मागणं मी मागते

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा

----------------

Gauri Aavahan Wishes in Marathi | File Image

गौरी आवाहन आणि पूजनाच्या

हार्दिक शुभेच्छा

-------------

Gauri Aavahan Wishes in Marathi | File Image

आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल

----------------------

Gauri Aavahan Wishes in Marathi | File Image

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी

गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा!

------------------------

गौरीच्या आवहना दिवशी गौराईला वेगवेगळ्या रूपात घरी आणलं जातं. घरातील कुमारिका प्रामुख्याने गौरी घरी आणतात. त्यानंतर त्यांचं पूजन केले जाते. काही घरात गौरी एकाच रूपात तर काही ठिकाणी ज्येष्ठा, कनिष्ठा अशा दोन रूपात पूजल्या जातात. त्यांना एका स्त्रीप्रमाणे सारा साजशृंगार करून नटवलं जातं आणि नंतर तिचं पूजन करण्याची पद्धत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif