Gatari 2022 Special Non-veg Recipes: गटारीसाठी स्पेशल 5 अस्सल महाराष्ट्रीयन मांसाहारी पदार्थ, व्हिडीओ पाहून तोंडाला सुटेल पाणी, पाहा व्हिडीओ
श्रावण सुरु होण्यापूर्वी तुम्ही स्वादिष्ट मांसाहारचा आनंद घेऊ शकता.आम्ही गटारीनिमित्त तुमच्यासाठी पाच अस्सल महाराष्ट्रीयन मांसाहारी पदार्थाची यादी आणि व्हिडीओ घेऊन आलो आहोत, पाहा व्हिडीओ
Gatari Amavasya 2022 Special Non-veg Recipes: पवित्र श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवस अधि गटारी अमावस्या साजरी केली जाते. गटारी अमावस्या गुरुवारी 28 जुलै रोजी साजरी केली जाईल. शुभ श्रावण महिन्यात मासाहार वर्ज्य असते. त्यामुळे आवडत्या मांसाहारी पदार्थांवर ताव मारण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागते. महाराष्ट्रात आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला गटारी साजरी केली जाते. गटारीच्या दिवशी कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि इतर नातेवाईकांसह घरी मेजवानीचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात, विविध पूजा केल्या जातात. कठोर पद्धतींचे पालन करण्याबरोबरच, लोक मद्य आणि मांसाहारला स्पर्शही करत नाहीत. परंतु काळजी करू नका. श्रावण सुरु होण्यापूर्वी तुम्ही स्वादिष्ट मासाहारचा आनंद घेऊ शकता.आम्ही तुमच्यासाठी पाच अस्सल महाराष्ट्रीयन मासाहारी पदार्थाची यादी आणि व्हिडीओ घेऊन आलो आहोत. [हे वाचा :- Gatari Amavasya 2022 Date in Maharashtra: गटारी अमावस्येची तारीख आणि का साजरी केली जाते, जाणून घ्या]
पाहा व्हिडीओ :-
- कोल्हापुरी मासे
कोल्हापूर त्याच्या चवदार तिखट करी आणि चटणीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही भात किंवा भारतीय भाकरीसोबत महाराष्ट्रीयन कोल्हापुरी फिश करी चा आस्वाद घेऊ शकता.
- खर्डा चिकन
खर्डा चिकन अनेक मसाले वापरून तयार केले जाते आणि स्वादिष्ट चटणी भाकरीसोबत खाल्ले जाते.
- मालवणी प्रॉन करी
सीफूड प्रेमींसाठी, कोकणची खास मालवणी प्रॉन करी, ताजी कोळंबी नारळाच्या ग्रेव्हीमध्ये एकत्र करून आणि खास मालवणी मसाला घालून बनवली जाते.
- वजडी
वजडी उर्फ बकरीचे आतडे हा सर्वात चवदार पदार्थ आहे आणि बनवण्याची पद्धतही सोपी असते.
- ब्लॅक मटन करी
ब्लॅक मटण करीमध्ये भारतीय मसाल्यांचा समावेश केला जातो आणि चवीला उत्तम लागते.
गटारीसाठी हे पदार्थ तुमच्यासाठी योग्य आहेत. वर दिलेल्या मांसाहारी पाककृती सोपी आहे आणि तुम्ही झटपट करू शकतात.