Gauri Ganpati Visarjan 2020 Quotes : गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी हे मराठी Messages, Whatsapp Status वर शेअर करुन द्या बाप्पांना निरोप
गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी हे खास मराठी संंदेश आपल्या Whatsapp Status, Facebook सह सोशल मीडियावर शेअर करुन आपण बाप्पाला निरोप देउ शकाल.
Ganpati Visarjan 2020 Quotes in Marathi: यंंदा कोरोनाच्या (Coronavirus) संंकटात सुद्धा बाप्पाचे आगमन अगदी जल्लोषात झाले, दीड दिवसाचे, तीन दिवसाचे बाप्पा तर आता आपआपल्या गावी सुद्धा पोहचले. आता वेळ आहे ती ज्येष्ठा गौरी (Jyeshtha Gauri) सह पाच दिवसांंसाठी आलेल्या बाप्पाच्या विसर्जनाची (Ganpati Visarjan). तिथी नुसार यंंदा 27 ऑगस्ट रोजी पाच दिवसाच्या गणरायांंना निरोप दिला जाणार आहे. गणपतीच्या दिवसात एकत्र येऊन केलेल्या पुजा, आरती, भजन आणि एकुणच धमाल ही वर्षभरासाठी पुरणारी असते. त्यामुळे जेव्हा बाप्पा आपल्या गावी जायला निघतात तेव्हा नकळत का होईना प्रत्येकजण भावुक होतोच. तुमच्या या भावना सोशल मीडियावर आपल्या मित्र, कुटुंंब व नातेवाईकांंसोबत शेअर करता याव्यात यासाठी काही खास ग्रीटींग्स आम्ही तयार केले आहेत, गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी हे खास मराठी संंदेश आपल्या Whatsapp Status, Facebook सह सोशल मीडियावर शेअर करुन आपण बाप्पाला निरोप देउ शकाल. Ganpati Visarjan Online Booking: गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी मंंडळ आणि नागरिकांना BMC कडे करावं लागणार Slot Booking; कुठे व कसे कराल बूकिंग?
खाली दिलेल्या शुभेच्छा पत्रांंना तुम्ही फक्त डाउनलोड करुन आपल्या सोशल मीडियावर शेअर करु शकता तसेच आपल्या मित्रांंना, कुटुंंबाला पर्सनली सुद्धा पाठवु शकता.
गणपती विसर्जन विशेष मराठी संंदेश
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
कोरोनाचं संकट दुर कर दाखव तुझी किमया
मग पुढच्या वर्षी तोच जल्लोष पाहायला
लवकर या मोरया!
गणपती चालले गावाला
चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
गणपती निघाले,खाली झाला मखर
तुमची वाट पाहु बाप्पा
पुढच्या वर्षी या लवकर
दरम्यान, गणेश विसर्जन हे घरगुती किंंवा कृत्रिम तलावात करावे, विसर्जनाच्या वेळी सोशल डिस्टंंसिंगचे नियम मोडु नये आणि यासंदर्भात महापालिकांंकडुन देण्यात आलेल्या सुचनांंचे पालन करावे हे सुद्धा लक्षात ठेवा.